सांगली - सांगली शहरांमध्ये अवैध गुटखाच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. दोन दिवसात शहरातील अनेक पान टपरी व गोडावूनवर छापे टाकून तब्बल साडे तीन लाखांचा अवैद्य गुटखा जप्त केला आहे.
अवैध गुटखा विक्री विरोधात धडक कारवाई...
गुटखा आणि सुगंधी तंबाखू वर राज्यात बंदी आहे, असे असतानादेखील सांगली शहरामध्ये अनेक पान टपऱ्यांमध्ये खुलेआमपणे गुटखा आणि सुगंधी तंबाखूची विक्री सुरू असल्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत आता सांगलीच्या अन्न व औषध प्रशासनाकडून या अवैध गुटख्याच्या विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगली शहरातील अनेक पान टपऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून छापे टाकण्यात येत आहेत. यामध्ये जवळपास तीन पान टपऱ्या व गोडावूनवर कालपासून टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये तब्बल साडेतीन लाखांचा अवैधरित्या विक्री केला जाणारा गुटखा, सुंगंधी तंबाखु, मावा व साहित्य जप्त करण्यात आले आहे.हेही वाचा
हेही वाचा - सांगलीतील कवठे पिरान गावचा कारभार पती-पत्नीच्या हाती