ETV Bharat / state

अल्पवयीन शाळकरी मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास

अल्पवयीन शाळकरी मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी पिडीत मुलीने धाडसाने त्या तरुणाविरुद्ध साक्ष महत्वाची ठरली.

accused-sentenced-to-one-year-rigorous-imprisonment-for-molesting-a-minor-schoolgirl
अल्पवयीन शाळकरी मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाचा सश्रम कारावास
author img

By

Published : Dec 31, 2020, 12:35 AM IST

सांगली- माझ्यावर प्रेम कर नाही तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत इस्लामपूर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीची छेडछाड आरोपीने केली होती. या प्रकरणी युवकाला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. अमित विलास कदम (वय.२५, रा. इस्लामपूर) असे आरोपीचे नाव आहे. ही शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर सी. मनुघाटे यांनी सुनावली.

सांगली जील्ह्यातील इस्लामपूर येथे ३ एप्रिल २०१८ ला अल्पवयीन मुलगी शाळेला जात असताना कदम याने मोटर सायकलवरून येवून तीला वाटेत अडवून व तीची ओढणी खेचली. गाडीवर बस असे म्हणत माझ्यावर प्रेम कर नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. यानंतर तीने इस्लामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी इस्लामपूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याची सुनावणी सुरू होती. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, तपासी अंमलदार कोमल पोवार यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. सहाय्यक सरकारी वकील रणजित पाटील यांनी आरोपीचे कृत्य हे पुर्व नियोजित असल्याने तसेच समाजामध्ये अशा प्रकारची पुन्हा कृत्ये होवू नयेत म्हणून अशा आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देणेत यावी असा युक्तीवाद केला. न्यायालयाने पुराव्याआधारे कलम३५४ (ड) व बाललैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमानुसार दोषी धरत एक वर्ष सश्रम कारावास व पाचशे रूपये दंड व दंड न भरलेस पाच महिने साधीक कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सह. सरकारी वकिल रणजित पाटील यांनी काम पाहिले. तपासी अंमलदार कोमल पोवार, पैरवी अधिकारी चंद्रकांत शितोळे, पोलीस नाईक संदीप शेटे यांनी सरकारी पक्षास मदत केली.

छेडछाड झालेल्या अल्पवयीन मुलीचे वडील फितूर झाले पण पिडीत मुलीने धाडसाने त्या तरुणाविरुद्ध साक्ष दिली. अन् छेडछाड करणाऱ्या अमित कदमला अद्दल घडवत निर्भिडपणा दाखवून दिला. या महत्वपूर्ण साक्षीमुळे कदम याला शिक्षा सुनावण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.