ETV Bharat / state

सांगलीत रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या खड्ड्यात दुचाकी पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू - दुचाकी अपघात

चिकुर्डे ते ऐतवडे खुर्द रस्त्यावर वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या चरित (नाल्यात) मोटारसायकल पडल्याने येलूर येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

two wheeler accident
दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू
author img

By

Published : Feb 16, 2020, 5:30 AM IST

सांगली - वाळवा तालुक्यात रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या खड्ड्यात दुचाकी पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. चिकुर्डे ते ऐतवडे खुर्द रस्त्यावर वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. मात्र, यामुळे ऐतवडे खुर्द ग्रामपंचायतीचा दुर्लक्षपणा उघडकीस आला आहे. या वळणावर दुसऱ्यांदा एखाद्या मोटरसायकल स्वाराचा अपघात झाला आहे. या अपघातात वाळवा तालुक्यातील येलूर येथील एक युवक जागीच ठार झाला आहे.

हेही वाचा... ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक; ३५ जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर

तालुका वाळवा येलूर येथील महेश तानाजी जाधव (32) हा युवक या अपघातात जागीच मृत्यू पावला आहे. महेश याची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो दिवसभर सेंट्रींगचे काम करत होता. सायंकाळी सहा ते दहा या वेळेत चिकुर्डे येथे चायनीजची गाडी चालवत होता. रात्री दुकान बंद करून तो आपल्या गावी जात असताना, चिकुर्डे ते ऐतवडे खुर्द रस्त्यावर वळणाचा अंदाज न आल्याने भल्यामोठ्या चरित तो मोटरसायकलसह कोसळला. यात तो दगडावर जाऊन पडला असल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात मध्यरात्री झाल्याने याची कोणालाही कल्पना नव्हती. मात्र, सकाळी मॉर्निंग वॉक करायला जाणाऱ्या लोकांना हा अपघात दिसून आला. जाधव यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगा आहे. महेश जाधव यांचे लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले होते. कुटुंबाचा आधारच गेल्याने महेशच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा... शेतकऱ्यांना दिवसा विजेसह पाणी अन् हमीभाव देण्यासाठी प्रयत्न करू - उद्धव ठाकरे

या अगोदर देखील येथेच झाला होता अपघात...

याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी कारवे (तालुका कराड) येथील दोन युवकांच्या मोटरसायकलचा अपघात झाला होता. त्यामुळे ऐतवडे खुर्द गावातील युवकांनी वाहनधारकांच्या संरक्षणासाठी या वळणावर ऐतवडे खुर्द ग्रामपंचायतीकडे रिफ्लेक्टर बसवण्याची मागणी केली होती. मात्र, ग्रामपंचायतीने जाणून बुजून दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर एका युवकाला आपला प्राण गमवावा लागला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.