ETV Bharat / state

'माती विना शेती'; टेरेसवर फुलवली पाण्यावर शेती

author img

By

Published : Dec 15, 2019, 12:46 PM IST

ऑगस्ट महिन्यात सावंत यांनी आपल्या पत्नीच्या सहायाने अपार्टमेंटच्या टेरिसवर ४०० स्क्वेअर फुटच्या जागेत पाण्याचे पाईपलाईन, कोकोपीटचे रॅक आणि शेडनेटचे आच्छादन उभारले. त्यातून 'माती विना शेतीचा' बगिचा फुलवला. बगिच्यात टोमॅटो, चेरी, कोथिंबीर, काकडी, पालक ही उत्पादने कोकोपीटच्या माध्यमातून तर पाण्यावर परदेशी भाज्या उगवल्या.

sangli
टेरिस शेतीचे दृश्य

सांगली- 'माती विना शेती' होऊ शकते, असे सांगितले तर कदाचित तुम्हाला पटणार नाही. मात्र, सांगलीतल्या एका दांपत्याने टेरेसवर हा प्रयोग यशस्वी केला आहे. पाणी कोकोपीटच्या सहाय्याने सावंत दांपत्याने परदेशी व इतर भाजीपाल्यांचे उत्पादन केले आहे. त्यांचा हा प्रयोग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

'माती विना शेती', टेरिसवर फुलली पाण्यावर शेती

शेती करायची म्हणजे जमीन, चांगली माती आणि मुबलक पाणी या गोष्टींची आवश्यकता असते. मात्र, जमीन, मातीशिवाय भाजीपाल्याचे उत्तम पद्धतीने उत्पादन केले जाऊ शकते, असे म्हटल्यावर आपल्याला यावर विश्वास बसणार नाही. पण, सांगलीतील रवींद्र सावंत यांनी ही किमया साध्य करून दाखवली आहे. ते पण घरच्या घरी. रवींद्र सावंत यांनी अपार्टमेंटमध्ये असलेल्या आपल्या फ्लॅटच्या टेरेसवर भाजीपाल्यांचे उत्तम उत्पादन केले आहे. यात प्रामुख्याने परदेशी भाजीपाल्यांचा मोठा समावेश आहे. विशेष म्हणजे, परदेशी भाजीपाला हा फक्त पाण्यावर पिकवला आहे. तर, इतर भाजीपाला हा कोकोपीटच्या माध्यमातून पिकवला आहेत.

सावंत यांचे शिक्षण बीएससी.अॅग्री झालेला आहे. आणि ते सध्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करत आहेत. नोकरीच्या निमित्ताने सावंत यांना बाहेरच्या देशात जाण्याची अनेक वेळा संधी मिळाली. विदेशात सावंत यांनी पाण्यावर केली जाणारी शेती पाहाली आणि त्यातूनच सावंत यांना आपल्या फ्लॅटच्या टेरिसवर स्वतःच्या कुटुंबासाठी भाजी पिकवण्याची संकल्पना सुचली.

सहा महिन्यापूर्वी शेतीच्या उभारणीला केली होती सुरुवात

ऑगस्ट महिन्यात सावंत यांनी आपल्या पत्नीच्या सहायाने अपार्टमेंटच्या टेरिसवर ४०० स्क्वेअर फुटच्या जागेत पाण्याचे पाईपलाईन, कोकोपीटचे रॅक आणि शेडनेटचे आच्छादन उभारले. आणि आपल्या टेरिसवर पाणी आणि कोकोपीटच्या माध्यमातून 'माती विना शेतीचा' बगिचा फुलवला. बगिच्यात टोमॅटो, चेरी, कोथिंबीर, काकडी, पालक ही उत्पादने कोकोपीटच्या माध्यमातून तर पाण्यावर परदेशी भाज्या उगवल्या आहेत. रिसायकलिंग द्वारे २०० लिटर पाण्यात या भाजीपाल्यांचे उत्पादन घेण्यात येत आहे. हा संपूर्ण परदेशी भाजीपाला प्रमुख्याने सलाद म्हणून तसेच पिझ्झा आणि बर्गरमध्ये वापरला जातो. विशेष म्हणजे, सावंत कुटुंब टेरेसवर पिकवलेला भाजीपाला स्वत: ही वापरतात आणि अपार्टमेंटमधल्या रहिवाशांना देखील मोफत देतात. रवींद्र सावंत यांनी आपल्या टेरिसवर केलेला 'माती विना शेतीचा' हा प्रयोग आज सर्वसामान्य नागरिकांबरोबर शेतकऱ्यांनाही दिशादर्शक ठरत आहे.

Intro:
स्पेशल स्टोरी.
exclusive..

READY TO AIR

स्लग - "माती विना शेती" टेरिसवर फुलली पाण्यावर शेती......

अँकर - "माती विना शेती" होऊ शकते,असं सांगितलं तर कदाचित तुम्हाला पटणार नाही.मात्र
सांगलीतल्या एका दांपत्याने टेरेस वर हा यशस्वी प्रयोग केला आहे.परदेशी व इतर भाजीपाल्यांचे सावंत दांपत्याने उत्पादन पाणी आणि कोकोपीटच्या माध्यमातून घेत आहे.
पाहुयात टेरिसवरील पाण्यावरची शेती..

Body:शेती करायची म्हणजे जमीन,चांगली माती आणि मुबलक पाणी या गोष्टींची आवश्यकता.मात्र जमीन, माती या व्यतिरिक्त भाजीपाल्याचे उत्पादन उत्तम पद्धतीने उत्पादन घेतले जाऊ शकते,असं म्हटल्यावर आपल्याला यावर कदाचित विश्वास बसणार नाही.पण सांगलीतील रवींद्र सावंत यांनी ही किमया साध्य करुन दाखवली आहे.तो पण घरच्या घरी...

आज टेरेसवर शेती ही संकल्पना सगळीकडे पाहायला मिळते,थोड्या फार प्रमाणात हौस आणि आवड म्हणून अनेक जण आपल्या घराच्या समोर,टेरेस वर छोट्या-मोठ्या भाजीपाल्यांचे उत्पादन घेताना पाहायला मिळतात.मात्र रवींद्र सावंत यांनी "माती विना शेती" हा प्रयोग यशस्वी केला आहे.अपार्टमेंट मध्ये असणाऱ्या टेरेसवर सावंत दांपत्याने भाजीपाल्यांचा उत्तम उत्पादन घेतला आहे.यात प्रामुख्याने परदेशी भाजीपाल्यांचा मोठा समावेश आहे. विशेष म्हणजे परदेशी भाजीपाला हा फक्त पाण्यावर पिकवला आहे.तर इतर भाजीपाला हा कोकोपीट याच्या माध्यमातून पिकवले आहेत.
रवींद्र सावंत यांचे शिक्षण बीएससी ऍग्री झालेला आहे.आणि ते सध्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करत आहेत,नोकरीच्या निमित्ताने सावंत यांना बाहेरच्या देशात जाण्याची अनेक वेळा संधी मिळाली,यावेळी त्यांना तिथे पाण्यावर केली जाणारी शेती पाहायला मिळाली आणि यातूनच सावंत यांनी आपल्या फ्लॅटच्या टेरिस वर स्वतःच्या कुटुंबासाठी भाजी पिकवण्याची संकल्पना सुचली.
आणि सहा महिन्यापूर्वी सावंत यांनी शेतीच्या उभारणीला सुरवात केली.
आणि ऑगस्ट महिन्यात त्यांनी आपल्या पत्नीच्या सोबतीने ते राहत असलेल्या अपार्टमेंटच्या टेरिस वर 400 स्क्वेअर फुटच्या जागेत पाण्याचा पाईपलाईन,कोकोपीटचे रॅक आणि शेडनेटचे आच्छादन उभारत.आपल्या टेरिस वर पाणी आणि कोकोपीटच्या माध्यमातून 'माती विना शेतीचे' गार्डन फुलवले आहे.

यात प्रामुख्याने परदेशी व देशी भाजीपाल्याचा समावेश आहे.विशेष म्हणजे यातील परदेशी भाजीपाला फक्त पाण्यावर पिकवला जातो,तर देशी भाजीपाला हा कोकोपीटच्या माध्यमातून पिकवला जात आहे.

आणि आज याठिकाणी टोमॅटो चेरी टोमॅटो कोथिंबीर काकडी पालक ही उत्पादने कोकोपीट च्या माध्यमातून तर पाण्यावर परदेशी भाचे आला पिकवला जात आहे रिसायकलिंग आरे 200 लिटर पाण्यात या भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यात येत आहे.हा संपूर्ण परदेशी भाजीपाला प्रमुख्याने सलाड म्हणून तसेच पिझ्झा आणि बर्गर मध्ये वापरला जातो.आणि सावंत यांच्या टेरेसवर पिकणारा भाजीपाला सावंत स्वतःच्या कुटुंबासाठी वापरत, अपार्टमेंट मधल्या रहिवाशांना ही अगदी मोफत देतात.

रवींद्र सावंत यांनी आपल्या टेरिसवर केलेला माती विना शेतीचा हा प्रयोग आज सर्वसामान्य नागरीकां बरोबर शेतकऱ्यांनाही दिशादर्शक आहे, असेच म्हणावे लागेल...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.