ETV Bharat / state

Kidnapped baby : अपहरण झालेले बाळ आईच्या कुशीत, तर महिला नर्स तुरुंगात

अपहरण ( Abduction ) झालेल्या एका दिवसाच्या बाळाची सुटका सांगली पोलिसांनी केली आहे. तर, अपहरणकर्त्या महिला नर्सला ( Kidnapped female nurse ) अवघ्या 6 तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नर्सने चिमुरड्या बाळाला थेट एका बॅगेत घालून महिलेने रुग्णालयातून ( nurse kidnapped the baby ) पलायन केले होतं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

kidnapped baby
बाळाचे अपहरण
author img

By

Published : Jul 24, 2022, 10:16 PM IST

सांगली - अपहरण ( Abduction ) झालेल्या एक दिवसाच्या बाळाची, अपहरणकर्त्या महिला नर्सचा ( Kidnapped female nurse ) अवघ्या सहा तासात सांगली पोलिसांनी छडा लावला आहे. त्यांनतर चिमुकला आपल्या आईच्या कुशीत सुखरूप सुखावला. तर, अपहरणकर्ती महिला नर्स गजाआड ( nurse kidnapped the baby ) झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एक दिवसाच्या बाळाचे अपहरण करणारी महिला नर्स दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात नोकरीला लागली होती. मात्र, हे अपहरण नेमकं कोणत्या कारणातून केलं ? हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत.

एका दिवसाच्या बाळाचे अपहण - तासगाव शहरातल्या सिद्धेश्वर चौक या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर अंजली पाटील यांच्या रुग्णालयामध्ये तालुक्यातल्या चिंचणी येथील एक महिला शनिवारी प्रसूती झाली होती. एक गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी सकाळी या बाळाचे अपहरण ( kidnapped baby ) करण्यात आले होते. सुरुवातीला एक नर्स असल्याचं भासवून हे अपहरण झाल्याचं समोर आलं होतं. तर चिमुरड्या बाळाला थेट एका बॅगेत घालून महिलेने रुग्णालयातून पलायन केले होतं. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा - Farmer Dies Due to Electric Shock : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू, दर्यापूर तालुक्यातील घटना

बाळाची सुखरूप सुटका - सदर घटनेची गंभीर दखल घेत, सांगली पोलिसांनी गतीने तपास सुरू केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, तासगाव पोलीस, विटा वाहतूक पोलिसांनी संयुक्तरीत्या तपास केला आहे. सातारा जिल्ह्यातल्या भवानीनगर येथील शेणोली रेल्वे स्टेशनवरून अपहरणकर्त्या महिलेला ताब्यात घवून बाळाची सुखरूप सुटका केली आहे.

अपहरणाच्या घटनेने खळबळ - स्वाती माने असे महिला नर्सचे नाव आहे. ती मूळची सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळची असून सध्या वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र या ठिकाणी राहते. संशयित स्वाती माने हिला अटक करण्यात आली आहे. दरम्यान तासगाव पोलिसांच्याकडून या महिलेची कसून चौकशी सुरू असून तिने हे अपहरण नेमकं कोणत्या कारणाने केलं ? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत. मात्र, अवघ्या एका दिवसाच्या बाळाच्या अपहरणाच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

हेही वाचा - Newborn Baby Stealing Sangli : एक दिवसाच्या बाळाची रुग्णालयातून चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.