ETV Bharat / state

इथं सगळेच सेम टू सेम, सांगलीच्या इस्लामपूरमध्ये भरली जुळ्यांची जत्रा - ट्विन्स-22

इस्लामपुरच्या मुक्तांगण प्ले स्कूल मध्ये लहान मुलांना खेळातून शिक्षणाची धडे देण्याचे काम केले जाते. शाळेमध्ये गेल्या 11 वर्षात आत्तापर्यंत 13 जुळ्या-बहिण भावंडांनी प्रवेश घेतला. त्यामुळे जुळ्या भावंडांनी मुक्तांगण शाळेत आपल्या शिक्षणाचे पहिलं पाऊल टाकत आज वेगवेगळ्या वर्गात शिक्षण घेत आहेत. मात्र अशा जुळ्यांना एकत्र करून एका अनोख्या पद्धतीचा 'ट्विन्स-डे" साजरा करण्यात आला आहे.

सेम टू सेम
सेम टू सेम
author img

By

Published : Feb 23, 2022, 10:49 AM IST

सांगली - "सेम टू सेम"हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा चित्रपट आपण पाहिला असेल, पण जुळ्यांची जत्रा पाहिली नसेल. मात्र सांगलीच्या इस्लामपूर मध्ये जुळ्यांची जत्रा भरली. 22-2-22 तारखेचे औचित्य साधून एका शैक्षणिक संस्थेने "ट्विनिस-22" या आगळ्यावेगळ्या धमाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि ज्यामध्ये तब्बल 35 जुळयांनी सहभाग घेत धमाल केली.

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये भरली जुळ्यांची भरली जत्रा

22-2-22 चा योग आणि "ट्विन्स-22"

इस्लामपुरच्या मुक्तांगण प्ले स्कूल मध्ये लहान मुलांना खेळातून शिक्षणाची धडे देण्याचे काम केले जाते. शाळेमध्ये गेल्या 11 वर्षात आत्तापर्यंत 13 जुळ्या-बहिण भावंडांनी प्रवेश घेतला. त्यामुळे जुळ्या भावंडांनी मुक्तांगण शाळेत आपल्या शिक्षणाचे पहिलं पाऊल टाकत आज वेगवेगळ्या वर्गात शिक्षण घेत आहेत. मात्र अशा जुळ्यांना एकत्र करून एका अनोख्या पद्धतीचा 'ट्विन्स-डे" साजरा करण्यात आला आहे. याचं निमित्त होतं 22-2-22 हा तारखेचा योगायोग.

तब्बल 35 जुळ्यांची जत्रा

मुक्तांगण हायस्कूलच्या माध्यमातून 22 तारखेला जुळ्या बहिण भावंडांचा "ट्विन्स-22" अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अनोख्या आणि आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाला तब्बल 35 जुळयांनी सहभाग घेतला. त्यामुळे मुक्तांगणचे परिसरात जुळ्यांची जत्रा भरल्याचे चित्र पाहायला मिळाले. "ट्विन्स-22"च्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये जुळ्या भावंडांनी उत्साहाने सहभाग घेत धमाल उडवून दिली.

जुळ्यांनी केली फुल टू धमाल -

जुळी मुले हा आजही समाजामध्ये कौतुकाचा व कुतूहलाचा विषय आहे. त्यामुळे मुक्तांगण मध्ये हा आगळावेगळा कौतुक सोहळा पार पडला. स्कूलच्या आवारात आकर्षक मंडप उभारण्यात आला होता. व्यासपीठावर फुग्यांनी सजावट केली होती. काही जुळ्या भावंडांनी एक सारखे कपडे घातले होते. काही जणांनी वेगवेगळे पोशाख परिधान केले होते. कोणी शिवबाचा, कोणी जिजामाताचा, कोणी सैनिकांचे वेगवेगळे कपडे परिधान करत वेगवेगळे योगा, डान्स, नाट्य, बडबडगीते, पोवाडा, पसायदान,बालगीते सादर करत जुळ्यांनी फुल टू धमाल केली. जुळ्यांच्या जत्रेमध्ये अनेक पालकांना आपल्या मुलांच्या मध्ये असणाऱ्या सुप्त कला पाहायला मिळाल्या तर काही पालकांची धांदल उडाली आणि आगळावेगळा जुळ्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

जुळ्यांच्या कार्यक्रमात तिळ्यांची उपस्थित -

मुक्तांगण आणि जुळी मुलं असे समीकरण गेली ११ वर्षें आहे. आज मंगळवारी अनोख्या उपक्रमात तब्बल ३५-जुळी सहभागी झाली. या कार्यक्रमाचे सर्वांनाच आकर्षण होते. गणेश, स्वरा, सई कुंभार या तीळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. सर्व जुळ्यांना पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तर एकाच वेळी अनेक जुळ्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.