सांगली - ब्रम्हनाळ येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेली खासगी बोट कृष्णा नदीत उलटली. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. सरकार मदत करत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आम्ही शासनाकडे लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटी मागत आहोत, मात्र सरकारने आम्हाला मदत केली नाही, असा आरोप ब्रम्हनाळ येथील गावकऱ्यांनी केला आहे.
मदतीसाठी कोणतेही पथक आले नसून प्रशासन मदत करत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. साडेचार तास होऊन गेले कोणतीही मदत आली नाही. तहसीलदार आणि जिल्हाधिकारी खोटे बोलत असल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले. पोलीस प्रशासन, महसूल खाते हे माध्यमांसमोर खोटे बोलत आहे. मृतदेहांची हेळसांड चालू असून, गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. बोट उलटल्याच्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.