सांगली - सांगलीच्या आणखी एका अवलियाने जुगाड गाडीचा भन्नाट प्रयोग केला आहे.अवघ्या 30 हजार रुपयात भंगारातील साहित्य आणि दुचाकीचा इंजन असा जुगाड करत 1930 सालाच्या मिनी फोर्ड गाडीचे मॉडेल बनवले आहे. अशोक आवटी या मॅकेनिकल कारागिराने ही ओल्ड मॉडेल जुगाड गाडी बनवली ( Ashok Awat ford in Sangli ) आहे.
नुकतेच देवराष्ट्रे येथील फेब्रिकेशन व्यवसायिक असणाऱ्या दत्तात्रय लोहार यांनी जुगाड जिप्सी गाडी बनवली होती. त्याचा चर्चा सुरू असताना आता आणखी एक जुगाड गाडी सांगलीत तयार झाली आहे.
हेही वाचा-पाच रुपयात करा पन्नास किलोमीटरचा प्रवास; नेरमधील 'रँचो'चा अनोखा जुगाड
सांगलीत बनली आणखी एक जुगाड गाडी
सांगली शहरातील काकानगर या ठिकाणी राहणाऱ्या अशोक आवटी मेकॅनिकल कारागिराने कल्पक बुद्धीने चक्क चारचाकी गाडी बनवली आहे. सातवी पास असणाऱ्या आवटे यांचे ट्रॅक्टर आणि दुचाकीचा गॅरेज आहे. 2019 च्या लॉकडाऊनच्या काळामध्ये युट्युबवर त्यांनी काही व्हिडिओ बघितले. त्यानंतर काही तर वेगळी चार चाकी गाडी बनवता येईल,का ? यासाठी प्रयत्न सुरू केला. तब्बल दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर एक भन्नाट चार चाकी गाडी बनवली आहे. ही गाडी अगदी हुबेहूब 1930 सालच्या फोर्ड गाडीच्या मॉडेलप्रमाणे तयार केली ( ford made from scrap in sangli ) आहे.
हेही वाचा-देशी जुगाड.. भंगारातील साहित्यापासून बनविले फवारणी यंत्र, केवळ 100 रुपयात पाच एकरात फवारणी
अशी आहे जुगाडातील फोर्ड गाडी
विशेष म्हणजे भंगारातील आणि दुचाकी व रिक्षाचे साहित्यातून ही जुगाड गाडी साकारली आहे. या गाडीची इंजन हे एमएटी दुचाकी आहे. गाडी सुरू करण्यासाठी रिक्षाप्रमाणे हँडल आहे. तसेच रिव्हर्स गिअरसाठी या गाडीला रिक्षाचा गिअरबॉक्स बसवला आहे. स्टेरिंग हे आवटी यांनी बनवले आहे. तर चाके ही एमएटी दुचाकीचे आहेत. तीन गियर असणारी ही चार चाकी फोर्ड गाडी, प्रति लिटर 30 किलोमीटर इतके मायलेज देते. चार व्यक्ती या गाडीमध्ये बसू शकतात. हेडलाईट अशा सर्व गोष्टी डाळिंबमधील अशोक आवटी यांनी कल्पकतेने बसविल्या आहेत. यासाठी पत्रा लोखंडी अँगल आणि इतर गोष्टींचा वापर करत आवटी यांची हे भन्नाट 1930 मॉडेलच्या फोर्ड गाडी प्रमाणे हुबेहूब तयार झाली ( like ford model from scrap by mechanical ) आहे. आता ती रस्त्यावर धावू लागली आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष ही मिनी फोर्ड गाडी वेधत आहे.
हेही वाचा-Best Out Of Waste In Sangli : असाही भन्नाट जुगाड... दुचाकी आणि भंगारातुन बनवली चारचाकी टुमदार गाडी
विकत घेण्याची ऐपत नाही,म्हणून...
याबाबत अशोक आवटी म्हणाले, मेकॅनिकल कारागीर आहे. त्यामुळे आपल्याला नेहमीच काही ना काही बनविण्याची आवड आहे. त्यामधून दहा वर्षांपूर्वी आपल्या गॅरेजमध्ये वीज नसल्याने स्वतः पवनचक्की बनवून त्यातून वीज निर्मिती केली होती. तसेच चार चाकी गाडी असावी, असे वाटायचे. त्यामुळे आपणच स्वतः दुचाकी चारचाकी गाडी बनवावी, अशी कल्पना होती. यूट्यूबवर आपण अश्या गाड्या पाहिल्या. त्यातून आपणही दुचाकीतून काही तर वेगळी गाडी बनवायची इच्छा होती. त्यामुळे 1930 सालच्या मिनी फोर्डप्रमाणे शंभर किलो वजनाचे स्वतःची ही मिनी फोर्ड गाडी बनविली आहे.
जुगाड जिप्सीनंतर मिनी फोर्ड
नुकताच देवराष्ट्रे येथील फेब्रिकेशन व्यवसाय करणारे दत्तात्रेय लोहार यांनी अशाच पद्धतीची भंगारातील साहित्य आणि दुचाकीचा इंजन याच्या माध्यमातून जुगाड जिप्सी तयार केली आहे. याची उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील दखल घेतली. त्यामुळे ही गाडी सध्या चर्चेत आहे. असताना सांगलीतल्या अशोक आवटी यांनीही एक जुगाड चार चाकी गाडी बनवली आहे. या गाडीचा आता सांगलीत बोलबाला आहे.