सांगली - येलूर येथील मालती तानाजी पाटील (वय 75) यांनी गुरुवारी रात्री दहा ते सकाळी दहाच्या दरम्यान लाकडी तुळीला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद कुरळप पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या संदर्भात पुतण्या संदीप भीमराव पाटील यांनी तक्रार नोंदवली होती.
वाळवा तालुक्यातील मालती पाटील या घरी एकट्याच असतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून मुलगा नोकरीसाठी बाहेरगावी आहे, तर मुलगीचे लग्न झाले आहे. त्या बरेच दिवसापासून मधुमेहाच्या रुग्ण होत्या. यामुळे त्या समोरील घरातून जेवणाचा डबा मागवत असत. रात्री 9.30च्या सुमारास घरा समोरच्या घरातील लोक जेवणाचा डबा देऊन गेले होते. सकाळी नेहमीप्रमाणे दहा वाजता जेवणाचा डबा घेऊन ते आले. या वेळी दरवाजा बंद असल्याने त्यांनी दरवाजाची कडी जोर जोरात वाजवली. आतून कसलाच आवाज न आल्याने त्यांनी मोठ्याने दरवाजा ढकलून पहिले असता. मालती पाटील यांनी सुती दोरीने लाकडी तुळीस गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. यावरून कुरळप पोलीस ठाण्याचे पोलीस कॉस्टेबल संजय पाटील व सचिन पाटील यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास पोलीस कॉस्टेबलल संजय पाटील करत आहेत.