ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर, दिवसभरात नव्या 41 रुग्णांची नोंद - सांगली कोरोना अपडेट

जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल 41 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 7 जण कोरोना मुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जत तालुक्यातील बिळूर येथील 24 रुग्णांचा समावेश आहे. एकाच दिवसात 24 रुग्ण आढळल्याने बिळूर हे गाव कोरोनाचे नवे हॉटस्पॉट सेंटर बनले आहे.

सांगली कोरोना अपडेट
सांगली कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 4, 2020, 8:18 AM IST

सांगली - जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल 41 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 7 जण कोरोना मुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये जत तालुक्यातील बिळूर येथील 24 रुग्ण आणि महापालिका क्षेत्रातील 7 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 476 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 262 जण कोरोना मुक्त झाले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 201 झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

जत तालुक्यातील बिळूर येथील 24, वाळव्याच्या इस्लामपूर 1 ,करंजवडे 1, वाळवा 1, आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी 2 , नेलकरंजी 1, खानापूर तालुक्यातील गार्डी 1 , विटा शहर 3, सांगली शहर 6 आणि मिरज शहर 1 असे 41 जणांचा समावेश आहे. या सर्वांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यात 4 जण हे परदेशातुन तर काही जण मुंबईहून आलेले आहेत.

एकाच दिवसात 24 रुग्ण आढळल्याने बिळूर हे गाव कोरोनाचे नवे हॉटस्पॉट सेंटर बनले आहे. तर सांगली महापालिका क्षेत्रात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवसभरात 7 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोना रुग्णालयात उपचार घेत असलेले 7 जण कोरोना मुक्त झाले आहेत. यामध्ये मणदुर (शिराळा) येथील 70 वर्षाची महीला, कवठेमहांकाळ (कवठेमहांकाळ) येथील 55 वर्षाचा पुरुष, शेटफळे (आटपाडी) येथील 32 वर्षाचा पुरुष, लेंगरेवाडी (आटपाडी) 55 वर्षाचा पुरुष, शिराळा (शिराळा ) येथील 39 वर्षाचा पुरुष, गोमेवाडी (आटपाडी ) येथील 52 वर्षाचा पुरुष, आंधळी(पलुस) येथील 60 वर्षाचा पुरुष, असे एकूण 7 जण कोरोना मुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 201 झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 476 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 263 जण कोरोना मुक्त झाले आहेत. तर १२ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये पर जिल्ह्यातील 7 जणांचा समावेश आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 1 ,कोल्हापूर जिल्ह्यातील 3 आणि कर्नाटक राज्यातील 3 असे एकूण 7 आहेत.

दरम्यान मिरजेच्या वानलेस हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या कर्नाटक राज्यातल्या अथणी येथील कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी येथील आणि सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या उपळावी येथील एक असा दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. या दोघांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.