सांगली : व्यसनाधीनताचा प्रकार दिवसेंदिवस समाजातल्या प्रत्येक स्तरात वाढताना पाहायला मिळतो. पालकांच्या व्यसनाधनाचा परिणाम मुलांवरही आपोआप होतो. यातूनच मग मुलांमध्येही व्यसनाधिनता बनण्याचे धडे आपोआप गिरले जातात.पण आपल्या पालकांना व्यसनाधीन पासून व्यसनमुक्ती देण्याचा धडा सांगलीच्या जत तालुक्यातील पांडोझरी गावात गेल्या पाच वर्षांपासून राबवला गेला आणि त्याचे यश आता समोर आले आहे. ( Freed 40 Families From Addiction In sangli )
40 पालक झाले निर्व्यसनी : पांडोझरी गावातल्या बाबर वस्ती ( Pandozhari village Babarvasti ) या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांनी ( Children Of Babarvasti School ) आपल्या पालकांना व्यसन मुक्त केला आहे. तब्बल 40 कुटुंबातील पुरुष मंडळी आता व्यसनमुक्त बनले आहेत. शाळेतल्या गुरुजींनी मुलांना व्यसनमुक्तीचे धडे दिले. त्यातून मग मुलांनी आपल्या वडिलांच्याकडे घरातल्या व्यसनाधीन बनलेल्या नातेवाईकांकडे व्यसन ( 40 Parents addiction free ) सोडण्याचा हट्ट धरला. गेल्या पाच वर्षांपूर्वी बाबर वस्तीतल्या शाळेतील शिक्षक आणि मुलांनी व्यसनमुक्तीचा चळवळ सुरू केली. घरोघरी शिक्षक आणि मुलांनी जाऊन व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली. त्याला यश म्हणून आज जवळपास 40 कुटुंबातील पुरुष मंडळी व्यसनाधीन पासून निर्व्यसनी बनले आहेत.आपले वडिल,काका,आजोबां पुढे मुलांनी व्यसन सोडण्याचा हट्ट धरला. मग आपल्या मुलांच्या सोबत त्यांच्या घरातल्या महिला वर्गांनी देखील सहभाग घेतला. व्यसनमुक्तीचा हट्ट धरल्यावर अनेक मुलांना आपल्या वडिलांचा मार देखील खायला लागला. पण मुलांच्या हट्टापुढे पालक झुकले आणि बघता बघता गावाने व्यसनाधीन पासून व्यसन मुक्तीचा मार्ग स्वीकारला. ( Freed 40 Families From Addiction )
दारू सोडण्यासाठी केला हट्ट : जिल्हा परिषदेच्या बाबर वस्ती शाळेत इयत्ता शिकणारी हर्षदा मोटे सांगते की, माझ्या घरी वडील यांना दारू आणि तंबाखुचे व्यसन होते. वडील दारू पिऊन आल्यानंतर कधी-कधी घरी भांडण होत असत. मी लहान असल्याने मला नेहमी भीती वाटायचे आणि मी तिसरीत असताना शाळेमध्ये व्यसनमुक्ती बाबतीत शिक्षकांकडून धडे देण्यात आले होते. शिक्षकांनी मग घरातील व्यक्तींचे व्यसन सोडण्यासाठी आम्हाला सांगण्यातले. मी वडिलांना दारू आणि तंबाखू सोडण्यासाठी हट्ट धरला. मग वडिलांचा मार देखील खावा लागला. पण मी रोज वडिलांच्याकडे हट्ट धरत होते आणि अखेर माझ्या हट्टा पुढे वडिलांनी दारू आणि तंबाखू सोडल्याचे हर्षदाने सांगितली.
मुलांच्या हट्टामुळे व्यसन सोडलेले दत्तात्रय : बाबर सांगतात की ,मी बरेच वर्षांपासून दारूच्या आहारी गेलो होतो. आमच्या बाबर वस्ती मधल्या शाळेतील शिक्षकांनी वाघमारे यांनी व्यसनमुक्तीच्या बाबतीत जनजागृती सुरू केली. मग त्या शाळेमध्ये शिकणारे माझ्या मुलांनी माझ्याकडे दारू सोडण्याबाबत हट्ट सुरू केला. मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करत होतो. पण मुलगा सुरेश आणि मुलगी स्वरांजली हीने आपल्याकडे सतत दारू सोडण्यासाठी हट्ट धरला होता. मग शेवटी आपण या मुलांच्या हट्टापुढे दारू सोडून टाकली. आता आपण पूर्ण निर्व्यसनी बनलो आहे, असे बाबर यांनी सांगितले.
मुथा फाऊंडेशनचे मूल्य वर्धन शिक्षणउपक्रम : ( Mutha Foundation ) पांडोझरी येथील बाबर वस्ती या ठिकाणी जिल्हा परिषदेची ( Zilla Parishad Babar Wasti School ) पहिली ते चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. या शाळेतले शिक्षक दिलीप वाघमारे यांनी ही व्यसनमुक्तीचे चळवळ 2017 मध्ये हाती घेतले. त्यासाठी त्यांना मुथा फाऊंडेशनचे मूल्य वर्धन शिक्षणउपक्रम आणि सलाम मुंबईच्या तंबाखू मुक्ती जनजागरणाची साथ लाभली. याबाबत शिक्षक दिलीप वाघमारे यांनी सांगितले की,जिल्हा परिषदेची वस्ती शाळा आहे आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी मजूर व पारधी तांडयावरील मुले या शाळेत शिक्षण घेतात. अनेक वेळा मुलांची पटसंख्या ही कमी असायचे, याचे कारण आम्ही जाणून घेतले. त्यावेळी रोज कोणाच्या तरी घरात व्यसनाच्या कारणामुळे भांडण होत होती. त्याचा परिणाम मुलांच्या शाळेतील उपस्थितीवर होेत होता. मग या व्यसनमुक्तीसाठी एक अभियान सुरू करायचा निर्णय घेतला.
व्यसनमुक्तीचा सकारात्मक परिणाम मिळाला : सुरुवातीला ज्यावेळी पालकांच्याकडे व्यसन सोडण्याबाबत विनंती करू लागल्यावर अनेकांनी अहवेलना केली. अनेक पालकांनी गुरुजी तुमचे काम मुलांना शिकवायचे आहे, तुम्ही मुलांना शिकवायचे काम करा. नाही त्या भानगडी करू नका असे सल्ले देखील दिले. मात्र त्याकडे मी दुर्लक्ष केले. मग विचार केला प्रत्येक पाल्य हे आपल्या मुलांना जीवापाड जपतात. त्यामुळे मुलांच्या मध्येच व्यसनमुक्तीच्या चळवळीचा ध्यास निर्माण करायचा. मग त्यातून मुथा फाउंडेशनच्या मूल्यवर्धन शिक्षण उपक्रमांमधून व्यसनमुक्तीचा धडा त्यांच्या मनात रुजवले. मग हळूहळू शाळेतली मुले आपल्या घरातल्या पालकांना व्यसन सोडण्यासाठी तगादा लावू लागले. अनेक मुलांच्या घरातल्या पालकांनी त्यांना या कारणातून मारहाण देखील केली. पण मुलांच्या मध्ये रोज व्यसनमुक्तीचा धडा ( Lessons from Addiction ) गिरवत असल्याने त्याचा परिणाम सकारात्मक पाहायला मिळाला आहे. तब्बल 40 कुटुंबातील लोकांनी मुलांच्या हट्टापुढे व्यसनाला राम राम केला आहे. मग ते दारू असेल तंबाखूचे असेल, सिगरेट, पान ,अशी सर्व व्यसन सोडून दिली आहेत. असे शिक्षक दिलीप वाघमारे यांनी सांगितले. मुलांनी जर ठरवले तर पालकांच्या वाईट गोष्टी सोडवता येतात. हे जत तालुक्यातल्या पांडोझरी गावातल्या मुलांनी दाखवून दिले आहे. शिवाय व्यसनमुक्तीची ही चळवळ पांडोझरी पॅटर्न ( Pandozhari pattern ) म्हणून आता पुढे येऊ लागली आहे.