ETV Bharat / state

Corona Virus : कुंडलवाडीत 30 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण, कुटूंबातील चार जण क्वारंटाईन

सांगली जिल्ह्यातील कुंडलवाडी (तालुका वाळवा) येथे मुंबईहून आलेल्या ३० वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा तरुण 12 मे रोजी मुबईवरून आला होता. त्याच्या कुटुंबातल चार व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याबरोबरच पाच दिवस गावात कडकडीत बंद पाळण्याचे ग्रांमपंचायतीने जाहीर केले आहे.

author img

By

Published : May 16, 2020, 4:39 PM IST

-corona-infected-in-sangli-four-members-of-the-family-quarantined
कुंडलवाडीत 30 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण, कुटूंबातील चार जण क्वारंटाईन

सांगली - कुंडलवाडी (तालुका वाळवा) येथे मुंबईहून आलेल्या ३० वर्षीय तरुणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे गावाच्या सीमा बंद केल्या असून गाव पाच दिवस बंद ठेवण्यात आले आहे.

सांगलीच्या कुंडलवाडी येथील हा तरुण 12 मे रोजी मुबईवरून आला होता. दोन दिवसापूर्वी रात्री त्याला त्रास जाणवत असल्याने त्याची येलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणी करण्यात आली होती. लक्षणे कोरोनासदृश्य असल्याने मिरज सिव्हिल हॉस्पिटलकडे संदर्भित करण्यात आले. या तरूणाचा शुक्रवारी स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे.

वाळवा तालुक्यातील कुंडलवाडीमधील हा तरुण नोकरीसाठी मुबंई येथे वास्तव्यास आहे. शासनाने परवानगी दिल्याने तो 12 तारखेला गावी आला होता. यावेळी गावातील त्याचा मित्र गुजरातहून मुबंई येथे येऊन हे दोघे सॊबत आल्याने त्याचाही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. मात्र त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर शुक्रवारी रात्री त्याच्या कुटूंबातील आई, वडील, बहीण व काका अशा चार लोकांना इस्लामपूर येथील प्राथमिक उप-केंद्रात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

त्याचबरोबर तरुणाच्या संपर्कात कोण-कोण आले याचे येलूर प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत 11 टीमच्या माध्यमातून 20 कर्मचारी 6 सुपरवायझर गावात सर्वेक्षण करत आहेत. बाधित तरुणाच्या घराजवळील परिसर सील करण्यात आला असून कुरळप पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला आहे. गाव पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत सरपंच रहीम शह्या फकीर, तंटामुक्त अध्यक्ष तानाजी कदम, पोलीस पाटील सुरैय्या इकबाल पटेल यांनी घेतला असून गावात मेडिकल दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत.

कुरळपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे व पोलीस पाटील यांनी त्या तरुणाशी फोनवरून बातचीत केली असता कुटूंबातील व बाहेरील कोणाच्याही संपर्कात आलेला नसून तब्बेतही ठीक-ठाक असल्याचे तरुणाने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.