सांगली - जिह्यात गुरुवारी (दि. 9 जुलै) दिवसभरात 27 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 12 जणांचा समावेश आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारपर्यंत बाधितांचा एकुण आकडा 589 वर पोहोचला आहे. तर 285 सक्रिय (ऍक्टिव्ह) रुग्ण उपचारार्थ आहेत. गुरुवारपर्यंत 289 जण कोरोनामुक्त तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
आटपाडीच्या कानकात्रेवाडी येथील 60 वर्षाच्या वृद्धाचा गुरुवारी मृत्यु झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा 15 वा बळी गेला आहे. कोरोना लागण झालेले जिल्ह्यातील गुरुवारचे नवे कोरोनाग्रस्त पुढील प्रमाणे, जत तालुक्यातील बिळूर येथील 2, निगडी येथील 1 ,जत शहर 1, आटपाडी तालुक्यातील कानकात्रेवाडी येथील 1, कौठुळी येथील 2, शिराळा तालुक्यातील मोरेवाडी येथील 1, बिळाशी 1, कवठेमहांकाळातील कोकळे येथील 1, मिरज तालुक्यातील शिंदेवाडी 2, बेळंकी 2, बिसुर 1. तर सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात 12 नवे रुग्ण आढळून आले असून यामध्ये सांगली शहरतील 10 आणि मिरज शहरातील 2, अशा एकूण जिल्ह्यातील 27 जणांचा समावेश आहे.
हेही वाचा - संकटकाळात कर्जवसूली करणाऱ्या कंपनीविरुद्ध शेतकरी संघटना आक्रमक..