ETV Bharat / state

वारणा नदीत मगरींचा वावर, नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका - वारणा नदीत मगर

वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील वारणा नदी पात्रात मगरींचा वावर आहे. आज (शनिवार) दोन मगरी नदीमध्ये दिसून आल्या आहेत.

sangli
वारणा नदीत मगरींचा वावर
author img

By

Published : May 16, 2020, 6:53 PM IST

Updated : May 16, 2020, 8:35 PM IST

सांगली - वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील वारणा नदी पात्रात मगरींचा वावर आहे. आज (शनिवार) दोन मगरी नदीमध्ये दिसून आल्या आहेत. यामुळे नदी काठच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वारणा नदीत मगरींचा वावर

चिकुर्डे वारणा पूल ते शिगाव पुलापर्यंत मगरीचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. मगरी पाण्याबाहेर येऊन गवतात पडलेल्या असतात. चिकुर्डे व ऐतवडे खुर्द या वारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांना या मगरीचा मोठ्या प्रमाणात धोका आहे. या नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नदीच्या काठावर असल्याने सतत गवत कापणीसाठी व रात्रीच्या वेळेस नदीवर विद्युत मोटरी चालू करण्यासाठी शेतकऱ्यांना यावे लागते. रात्री-अपरात्री शेताला पाणी पाजण्यासाठी जावे लागत असल्यामुळे मगरी केव्हाही हल्ला करू शकतात. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत.

2005 साली महापूर आला होता, तेव्हापासून या ठिकाणी मगरींचा वावर वाढला आहे. ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीपूल हा कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्याला जोडणारा दुवा आहे. या नदीवर ऐतवडे खुर्द व पलीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील नेलेवाडी येथील महिला धुणे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. यामुळे या मोकाट वावरणाऱ्या मगरींपासून धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी चिकुर्डे व ऐतवडे खुर्द नागरिकांनी वेळोवेळी वनविभागाला कळवले आहे. परंतू, अद्यापही मगरींचा बंदोबस्त केलेला नाही. आता तर दिवसातून कधीही या मगरी पाण्याबाहेर येत आहेत. त्यामुळे मगरींचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी ऐतवडे गावच्या नागरिकांनाकडून होत आहे.

Last Updated : May 16, 2020, 8:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.