सांगली - जिल्ह्यात सोमवारी (दि. 6 जुलै) दिवसभरात 15 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 6 जणांचा समावेश आहे. सोमवारपर्यंत कोरोनाबाधितांचा एकुण आकडा 519 वर पोहोचला आहे. तर जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ही 229 असून यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यात सोमवारी रात्रीपर्यंत 15 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 6 जणांचा समावेश आहे. सोमवारी कोरोनाबाधित झालेल्यांमध्ये जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी 1 ,जत तालुक्यातील बिळूर येथील 2, पलूस तालुक्यातील अमणापुर येथील 1, शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 3, मिरज तालुक्यातील व्यंकोचीवाडी 1, शिंदेंवाडी येथील 1 तर सांगली महापालिका क्षेत्रातील 6 जणांचा समावेश आहे. ज्यामध्ये मिरज शहरातील 5 आणि सांगली शहरातील 1 असे 15 जणांचा समावेश आहे. या सर्वांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर दिवसभरात वाढलेले रुग्ण यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या 229 झाली आहे. तर आतापर्यंत एकूण 519 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 255 जण कोरोना मुक्त झाले आहेत, तर 13 जणांचा मृत्यू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
हेही वाचा - नागरिकांना अव्वाच्या-सव्वा बिले.. महाविरणविरुद्ध सांगलीत सर्वपक्षीय आंदोलन