ETV Bharat / state

सांगलीत १५ यांत्रिक बोटींचे लोकार्पण; मंत्र्यांच्या हस्ते सोपस्कार केल्याचा ग्रामस्थांचा आरोप - जयंत पाटील सांगली बोट लोकार्पण

जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते नव्या १५ बोटींचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने भिलवडी आणि ब्रम्हनाळ याठिकाणी बोटी दिल्या आणि काही वेळात बोटी परत घेण्याचा प्रयत्न केला. उद्धाटनाच्या राजकारणासाठी हा प्रकार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

Boat
बोटी
author img

By

Published : Aug 9, 2020, 5:00 PM IST

सांगली - काही दिवसांपूर्वी कृष्णा नदीच्या पात्रात दाखल झालेल्या नव्या यांत्रिक बोटींचे लोकार्पण आज मंत्रांच्या उपस्थिती पार पडले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते नव्या १५ बोटींचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, दोन दिवसांपूर्वी प्रशासनाने भिलवडी आणि ब्रम्हनाळ याठिकाणी बोटी दिल्या आणि काही वेळात बोटी परत घेण्याचा प्रयत्न केला. उद्धाटनाच्या राजकारणासाठी हा प्रकार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

सांगलीत १५ यांत्रिक बोटींचे लाकार्पण

सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षी आलेल्या महापुरात बोटींच्या कमतरतेमुळे बचाव कार्यात मोठी अडचण आली होती. ब्रम्हनाळ येथे बोट दुर्घटना घडून १७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बोटी खरेदीकरून नदी काठच्या गावांना देण्याचा निर्णय घेतला होता. आता संभाव्य महापूराच्या तोंडावर जिल्हा परिषद प्रशासनाने खरेदी केलेल्या नव्या १५ यांत्रिक बोटी दोन दिवसांपूर्वी कृष्णेच्या पात्रात सज्ज केल्या होत्या. यावेळी बंदरे आणि मरिन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कृष्णेच्या पात्रात बोटींची यशस्वी चाचणी सुद्धा घेण्यात आली होती. त्यानंतर यातील २ बोटी भिलवडी आणि ब्रम्हनाळ याठिकाणी रवाना करण्यात आल्या. मात्र, काही वेळात प्रशासनाने बोटींची चाचणी बाकी असल्याचे कारण देत बोटी परत घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कृष्णेतील पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी बोटी देण्यास नकार दिला होता.

चाचणी केली नसताना प्रशासनाने बोटी दिल्याच का? असा सवाल करत बोटींच्या उद्घाटनासाठी त्या परत घेतल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. तर केवळ मंत्राच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी या बोटी परत मागून श्रेय घेण्याचा हा प्रकार असल्याची टीका जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केली होती. बोटींचे राजकारण करून नये, असा इशाराही त्यांनी दिला होता. या सर्व परस्थितीमध्ये आज जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते बोटींचा लोकार्पण सोहळा पार पडला. सांगली-मिरजेचे आमदार, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

याबाबत मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता, त्यांनी या प्रश्नावर बोलताना या किरकोळ गोष्टी असल्याचे स्पष्ट करत ब्रम्हनाळकरांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. आम्हाला सगळ्याचा गावांना बोटी वाटायच्या होत्या. मात्र, त्याअगोदर या बोटी कशा आहेत? त्याचा दर्जा काय आहे? हे पाहणे गरजेचे होते. बोटीमध्ये जास्त माणसे बसल्याने झालेली ब्रम्हनाळची दुर्घटना घडल्याचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे किमान ब्रम्हनाळकरांनी तरी अताताईपणा करू नये, असे पाटील म्हणाले.

मात्र, यावर ब्रम्हनाळचे रहिवासी असणारे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते संदीप राजोबा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या मरिन आणि बंदरे विभागातील तज्ञ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व १५ बोटींच्या चाचण्या सांगलीच्या कृष्णा नदीत झाल्या. नंतर आम्हाला प्रशासनाने बोट घेऊन जाण्यास सांगितले. त्यामुळे जयंत पाटील त्या अधिकाऱ्यांपेक्षा जास्त तज्ज्ञ आहेत का? की त्यांना त्यांच्याच अधिकाऱ्यांवर भरोसा नाही. केवळ सोहळा करायचा होता, तर तसे सांगायला हवे होते. आम्ही स्वत: त्यांच्या हस्ते बोटींचे लोकार्पण केले असते, असा टोला संदीप राजोबा यांनी लगावला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.