सांगली : शिराळा तालुक्यातील खुजगावात शॉर्टसर्किटमुळे जनावरांच्या शेडला आग (animal sheds caught fire due to short circuit) लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये 13 शेतकऱ्यांचे शेड जळून खाक (13 farmers shed burned in fire) होऊन 4 जनावरांचा होरपळून मृत्यू (4 animal burned in fire) झाला आहे,तर एक जनावर गंभीर जखमी झाला आहे. Sangli crime, latest news from Sangli
विजेच्या डीपीमुळे शॉट सर्किट - खूजगाव या ठिकाणी एकाच वेळी 13 शेतकऱ्यांच्या जनावरांच्या शोधा आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर एक जनावर गंभीर जखमी झाले आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास जनावरांच्या शेड जवळ असणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या डीपी मध्ये शॉटसर्किट होऊन ही आग लागली. त्यानंतर लागून-लागून असणाऱ्या जनावरांच्या शेड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
जनावरे व संसारपयोगी साहित्य जळून राख - यावेळी लागलेल्या आगीतून युवक व शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून आगीतून 30 जनावरे सुखरूप बाहेर काढली. पण आगीत 3 म्हशी, 1 रेडकू या आगीत होरपळून मृत्यूमुखी पडले. तर जनावरांच्या शेडसह भात, पिंजर, कडबा ,गवत, शेती औजारांसह संसार उपयोगी साहित्य जळून 13 शेतकरयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.