ETV Bharat / state

जतमध्ये बेकायदा दारू अड्यावर छापा १ लाख ८० हजारांचा साठा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई - सांगली गुन्हे वृत्त

जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथे बेकायदेशीर एक लाख ८० हजार रुपयांचा बियर साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली.

Jat liquor raid
जतमध्ये बेकायदा दारू अड्यावर छापा
author img

By

Published : Dec 26, 2020, 3:58 PM IST

सांगली - जत तालुक्यातील आसंगी तुर्क येथे बेकायदेशीर एक लाख ८० हजार रुपयांचा बियर साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली. पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी सांगली जिल्हयातील सर्व अवैध धंद्यांची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

त्याप्रमाणे शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी अवैध धंद्यांवरती कारवाई करणेसाठी पथक तयार केले होते. त्याअनुषंगाने जत विभागात पेट्रोलिंग करीत अवैध धंदे याची माहिती घेत असताना सहा. पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना त्यांचे खास बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, मिरासाब मुजावर हा आसंगी गावी आपल्या घराशेजारी बसुन बिअरच्या बाटल्या विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीप्रमाणे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी आसर्गी गावी मिरासाब मुजावर याचे घराशेजारी छापा मारुन बिअर विकणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव मिरासाहेब मोदिन मुजावर (वय-२८ रा. आसंगी तुर्क ता. जत) असे आहे.

त्याच्याकडून नॉकआऊट पंच कंपनीच्या ६५० मिलीच्या बिअरचे ६३ बॉक्स किंमत रुपये १ लाख ५१ हजार २०० रूपये व नॉकआऊट पंच कंपनीच्या ३३० मिलीच्या बिअरचे १२ बॉक्स किमत रुपये २८ हजार ८०० रूपये असा एकूण १ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.