ETV Bharat / state

थरारक : रत्नदुर्ग किल्ल्यावर दरीच्या मधोमध अडकला तरूण; रेस्क्यू करून वाचवले प्राण

author img

By

Published : Sep 30, 2021, 7:38 PM IST

रत्नदुर्ग किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेला एका तरुणाचा तोल गेला. तोल जाऊन पडल्याने तो कड्याच्या दिशेने घरंगळत जाऊन मधोमध अडकला. मदतीसाठी ओरडणारा या व्यक्तीकडे तेथे फिरण्यासाठी आलेल्या अन्य व्यक्तींचे लक्ष जाताच त्यांनी याची माहिती तेथील स्थानिकांना दिली. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस व कोस्टल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करून तरुणाचे प्राण वाचवले.

young man stuck in middle of valley at Ratnadurg fort
थरारक : रत्नदुर्ग किल्ल्यावर दरीच्या मधोमध अडकला तरूण

रत्नागिरी - रत्नदुर्ग किल्ल्या पाहण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाचा किल्ल्यावरील पायवाटेवरून पाय घसरून तोल गेला. त्यामुळे तो तीस फूट खोल कड्याच्या दिशेने घरंगळत गेला. कडा आणि पाऊलवाटेच्या मधोमध अडकला. मदतीसाठी जोराने ओरडणाऱ्या त्या पर्यटकाकडे सर्वांचे लक्ष गेले. स्थानिक आणि पेलिसांनी रेस्क्यू करून तरुणाचे प्राण वाचवले आहेत.

थरारक : रत्नदुर्ग किल्ल्यावर दरीच्या मधोमध अडकला तरूण; रेस्क्यू करून वाचवले प्राण

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने केली सुटका -

रत्नदुर्ग किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेला एका तरुणाचा तोल गेला. तोल जाऊन पडल्याने तो कड्याच्या दिशेने घरंगळत जाऊन मधोमध अडकला. मदतीसाठी ओरडणारा या व्यक्तीकडे तेथे फिरण्यासाठी आलेल्या अन्य व्यक्तींचे लक्ष जाताच त्यांनी याची माहिती तेथील स्थानिकांना दिली. स्थानिक ग्रामस्थ, पोलीस व कोस्टल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या साह्याने वर खेचत त्याची सुटका केली. हा प्रकार सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.

घसरलेली व्यक्ती दरी आणि कड्याच्या मधोमध अडकला -

उतारावरून सुमारे तीस फूट घरंगळत जात तो पायवाट आणि कडा यामधील भागात अडकला. जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या या व्यक्तीकडे तेथे फिरण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांचे लक्ष गेले. त्यांनी स्थानिकांना याची माहिती दिल्यावर त्यांनी मदत कार्याला सुरुवात केली. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. कोस्टल विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने दोरीने खाली उतरत अडकलेल्या व्यक्तीला वर काढले. भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या त्या व्यक्तीला सर्वांनीच धीर दिला. स्थानिक ग्रामस्थ सतीश तळेकर, संदेश कीर, ओजस कीर, तेज कीर, सुयश तळेकर, दशरथ कवडे, साहिल मोंडकर यांनी त्या व्यक्तीचा जीव वाचवण्यात पोलिसांना सहकार्य केले.

हेही वाचा - रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात कार पुलावरून थेट नदीत; पाहा VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.