ETV Bharat / state

कॅनिंगसाठी परराज्यातून आंबा खरेदी करू देणार नाही - माने - Ratnagiri News Update

जिल्ह्यातील प्रोसेसरांना कॅनिंगसाठी अन्य ठिकाणचा स्वस्त आंबा आम्ही इथे आणू देणार नाही. प्रोसेसरांना कॅनिंगसाठी इथलाच आंबा खरेदी करावा लागेल, आणि त्याला किमान 40 रुपये प्रति किलोचा दर मिळाला पाहिजे, अशी मागणी माजी आमदार तथा रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी केली आहे.

कॅनिंगसाठी परराज्यातून आंबा खरेदी
कॅनिंगसाठी परराज्यातून आंबा खरेदी
author img

By

Published : May 4, 2021, 3:58 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील प्रोसेसरांना कॅनिंगसाठी अन्य ठिकाणचा स्वस्त आंबा आम्ही इथे आणू देणार नाही. प्रोसेसरांना कॅनिंगसाठी इथलाच आंबा खरेदी करावा लागेल, आणि त्याला किमान 40 रुपये प्रति किलोचा दर मिळाला पाहिजे, अशी मागणी माजी आमदार तथा रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाळ माने यांनी केली आहे.

याबाबत बोलताना माने म्हणाले की, काही कॅनिंगवाले इथल्या शेतकऱ्याला दाबण्याकरता कॅनिंगसाठी लागणारा माल परराज्यातून आणतात. मात्र रत्नागिरीच्या शेतकऱ्याचा आंबा घेतल्याशिवाय, रत्नागिरीतल्या कुठल्याही मोठ्या प्रोसेसरला अन्य ठिकाणचा स्वस्त माल आम्ही इथं आणू देणार नाही, असा इशारा माने यांनी दिला आहे. तसेच कमी भावात कॅनिंगला इथला आंबा न घेता, कॅनिंगसाठीच्या इथल्या दर्जेदार आंब्याला किमान 40 रुपये भाव हा मिळालाच पाहिजे, अशी भूमिका रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाची आहे. तसेच शेतकऱ्यांना याबाबत काही अडचण आल्यास त्यांनी रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाशी संपर्क करावा, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

कॅनिंगसाठी परराज्यातून आंबा खरेदी

'शेतकऱ्यांनी 'जीआय' मानांकन नोंदणी करणं आवश्यक'

कोकणाचे अर्थकरण आंबा व्यवसायावर आहे. मात्र लहरी हवामानाचा परिणाम हापूसच्या उत्पादनावर झालेला आहे. आंबा पीक हे फक्त 3 महिन्याचं वाटत असलं, तरी 10 महिने आंबा उत्पादक शेतकरी या आंब्यासाठी मेहनत घेत असतो. आज हापूसला जीआय मानांकन मिळाल्यामुळे एक चांगला दर्जा निर्माण झालेला आहे. मात्र दुर्दैवाने हापूसच्या नावाखाली आज इतर राज्यातील आंबा सुद्धा विकला जातो. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जीआय मानांकन नोंदणी करणं आवश्यक असल्याचं माने यांनी यावेळी म्हटले. तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्याच्या आंब्याला थेट चांगल्या प्रकारे भाव मिळाला पाहिजे, मात्र राज्य सरकारचं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आजही शेतकऱ्यांना आंबा विक्रीसाठी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. गेल्या वर्षी आम्ही सर्वांनी थेट आंबा विक्रीसाठी प्रयत्न केले होते, काही प्रमाणात हा प्रयत्न यशस्वी झाला. मात्र यावर्षी पुन्हा एकदा कोरोनाचं संकट गडद झालेलं आहे, त्यामुळे जो थेट ग्राहक होता तो सुद्धा तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. आंब्याला चांगला दर मिळाला नाही तर शेतकरी अडचणीत येणार आहे, त्यामुळे आंबा उत्पदक शेतकऱ्यांची सरकारने मदत करावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.

हेही वाचा - सरकारने नवी ऑर्डर दिली नसल्याची माहिती चुकीची; पुढच्या खेपेत ११ कोटी डोस मिळणार - अदर पुनावाला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.