रत्नागिरी - कोकणाला एकूण 720 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे मच्छिमारी हा कोकणातला एक महत्वाचा व्यवसाय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मच्छीमारी व्यवसाय हा संकटात सापडला आहे. परराज्यातील मच्छिमारांचे अतिक्रमण आणि मत्स्य दुष्काळ यामुळे कोकणातील मच्छिमार संकटात सापडला आहे.
सरकारने मच्छिमारांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील मच्छिमार करत आहेत. नेमक्या कोणत्या समस्यांना या मच्छिमारांना सामोरे जावे लागत आहे. सरकार त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देते का नाही? स्थानिक लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने त्यांचे प्रश्न हाताळतात? राज्यकर्त्यांकडून या मच्छिमारांच्या काय अपेक्षा आहेत? याबाबत मच्छिमारांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी....