ETV Bharat / state

'आयलॉग'ला विरोध करण्याची आवश्यकता नाही, प्रकल्पाबाबत शिवसेनेत संभ्रमावस्था?

आयलॉग जेटीला जे समर्थन होत आहे. ते केवळ स्वार्थासाठी आहे. हा प्रकल्प मुळातच मच्छीमारांसाठी घातक आहे, असा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

Vinayak Raut
विनायक राऊत
author img

By

Published : Feb 16, 2020, 7:36 PM IST

रत्नागिरी - आयलॉग प्रकल्प एवढा घातक नाही. तेथील ग्रामपंचायतीने आयलॉग प्रकल्पाचे स्वागतच केले आहे. त्यांनी या प्रकल्पाला एनओसी दिली आहे, जागा दिली आहे. त्यामुळे आयलॉगला विरोध करण्याची आवश्यकता नाही, असे मत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शिवसेनेची या प्रकल्पाबद्दल नेमकी काय भूमिका आहे, हा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीच 4 फेब्रुवारीला या प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती देण्यात असल्याचे जाहीर केले होते.

विनायक राऊत, खासदार

दरम्यान, आयलॉग जेटीला जे समर्थन होत आहे. ते केवळ स्वार्थासाठी आहे. हा प्रकल्प मुळातच मच्छीमारांसाठी घातक आहे. आंबोळगडमध्ये केवळ जेटी उभारण्यात येणार नसून या जेटीआडून औष्णिक प्रकल्प आणण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

राजापूर तालुक्यातील आंबोळगड-नाटे येथील प्रस्तावित आयलॉग बंदर प्रकल्प रद्द करावा, या मागणीसाठी आंबोळगड परिसरातील ग्रामस्थांनी 4 फेब्रुवारीला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी नाटे पंचक्रोशी परिसर, बचाव समिती, जनहक्क सेवा समितीचे पदाधिकारी यांच्यासह आंबोळगड ग्रामस्थ प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी या प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती देत असल्याचे जाहीर केले. तसेच तज्ज्ञांशी चर्चा आणि अभ्यासाअंती अंतिम निर्णय घेतला जाईल, शिवाय गरज पडल्यास आंबोळगडला भेट देणार असल्याचे आश्वासन या दिलं होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.