रत्नागिरी - मुंबई पुण्यात नोकरीसाठी गेलेले नागरिक कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे परत कोकणमध्ये आपापल्या गावी परतत आहेत. अशात कोकणात कोरोनाचा धोका वाढला आहे. यामुळे रत्नागिरी जिह्यातील काही गावांनी बाहेरून येणाऱ्या त्यांच्याच गावातील नागरिकांसाठी शाळेमध्ये आदर्शवत व्यवस्था केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यामधील पन्हळी, गुडेघर, उमरोली, वेरूळ धामणी या गावांनी महाराष्ट्रासमोर एक वेगळा पॅटर्न समोर ठेवला आहे. यात त्यांनी बाहेरून येणाऱ्या त्यांच्याच गावातील नागरिकांसाठी शाळेमध्ये तात्पुरता स्वरुपात लहान-लहान खोल्यांची निर्मीती केली आहे. ग्रामस्थांनी या खोल्या कापडाने उभारल्या आहेत. यात त्यांनी लाईट, फॅन याचीही व्यवस्था केली आहे.
बाहेरून येणाऱ्या नागरिकांना या खोल्यांमध्ये १४ दिवस क्वारंटाईन केलं जाणार आहे. पण, सर्व सुविधा या खोल्यांमध्ये असल्याने त्या लोकांची गैरसोय होणार नाही. याची दक्षता गावकऱ्यांनी घेतली आहे. महत्वाची बाब म्हणजे, क्वारंटाईन केलेल्या लोकांना गावकऱ्यांकडून जेवण, चहा-पाण्याची सोय मोफत करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी याचा खर्च गावाच्या बचतीमधून तसेच प्रत्येक घराने याकामी एक हजार रुपयांची मदत देऊ केली आहे.
हेही वाचा - जिल्ह्यात अखेर 56 दिवसांनंतर वाईन शॉप्स सुरू सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचं पालन करून मद्यप्रेमी रांगेत
हेही वाचा - चिंताजनक... रत्नागिरी जिल्ह्यात 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 82 वर