रत्नागिरी - आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला लॉकडाऊनचे निर्बंध उठवल्यानंतर पहिल्यांदाच हा सण साजरा केला जात असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. अद्यापही कोरोनाचे सावट असले तरीही रत्नागिरी मात्र दिवाळीसाठी सजली आहे. बाजारपेठाही रंगबेरंगी आकश दिवे आणि विद्युत रोषणाईने झगमगू लागल्या आहेत. असे असले तरी कपड्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची दुकाने याकडे लोकांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
दिवाळीसाठी सजल्या बाजारपेठा कोरोना कमी होतोय पण...यावर्षी सर्वच सणांवर कोरोनाचे सावट होते, गणेशोत्सव, दसरा हे सण अतिशय साधेपणाने साजरे करावे लागले होते. दरम्यान सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना नियंत्रणात येऊ लागला आहे. ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात बहुतांश उद्योग व्यवसाय सुरू झाल्याने आता जनजीवन पूर्ववत होत आहे. मात्र असे असले तरी स्थानिक बाजारपेठेत कोरोनाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. दिवाळीसाठी सजल्या बाजारपेठा; मात्र खरेदीचा कल कमीच खरेदीकडे लोकांचा कल कमी सध्या दिवाळीमुळे बाजारपेठा देखील सजल्या आहेत. सर्व ठिकाणी दुकाने आकाश कंदील, पणत्या, आकर्षक रंगीबेरंगी फुले यांनी सजलेली दिसत आहेत. दुकानांमध्ये विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ असली, तरी खर्च करताना लोकं हात आखडता घेताना दिसत आहेत. कारण कोरोनामुळे अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या आकाश कंदील, पणत्या, मेणबत्ती यांसह इतर साहित्य खरेदी करताना दिसत आहेत. पण कपडे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंंच्या दुकानांकडे लोकांचा कल कमी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या व्यवसायिकांना ऐन दिवाळी सणात ग्राहकांची प्रतिक्षा करावी लागत आहे. बाजारात गर्दी, मात्र खरेदीसाठी ग्राहकांचा निरुत्साह ऑनलाइन खरेदीचाही परिणाम दिवाळी काळात सध्या नागरिकांकडून ऑनलाइन खरेदीला पसंती दिली जात आहे. कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वेगवेगळ्या घरगुती वस्तुंची देखील सध्या ऑनलाइन मागणी नोंदवली जात आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत आर्थिक उलाढालीवर त्याचा मोठा परिणाम झाला असल्याची खंतही व्यावसायिकांतून व्यक्त केली जात आहे.