ETV Bharat / state

माझे नगराध्यक्ष पद काहींना अडचणीचे वाटत होते - वैभव खेडेकर - वैभव खेडेकर

मनसे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना आज उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केली. तर कारागृहातून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या आरोप केले.

Vaibhav Khedkar
author img

By

Published : Aug 9, 2019, 2:01 PM IST

रत्नागिरी - राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना दमदाटी आणि नवीन जगबुडी पुलाच्या रेलिंगला बांधल्याप्रकरणी अटकेत असलेले मनसे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची आज जामिनावर सुटका झाली. दरम्यान, कारागृहातून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या आरोप केले.

कारागृहातून बाहेर आल्यानंतर वैभव खेडकर यांची प्रतिक्रिया

यावेळी ते म्हणाले, राजकीय षड्यंत्र वापरून ही चळवळ दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला. मला जामीन मिळू नये, मी खडी फोडायला जावे, मनसेची वाटचाल थांबावी, अशा पद्धतीचे अनेक प्रकार याठिकाणी झाले. मी कुठेतरी त्यांना राजकारणात अडचणीचा ठरत होतो आणि माझे नगराध्यक्ष पद काहींना अडचणीचे वाटत होते. त्यामुळे मला ३ महिने आत ठेवून माझे नगराध्यक्ष पद काढून घ्यायचे आणि आपला माणूस त्याठिकाणी बसवायचा अशा पद्धतीचे राजकारण झाला. परंतु, जनतेचा आणि कुलस्वामिनीचा आशीर्वाद असल्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या जोरावर बाहेर आलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

माझ्यावर गुन्हा दाखल करणारे हे सरकारी गुंड आहेत -

मी वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी त्या ब्रिजवर गेलो होतो. २९ जूननंतर २ जुलैला गुन्हा दाखल होतो. म्हणजे यामध्ये राजकारण आहे. सत्तेचा वापर करून माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला दाबण्याचा हा प्रकार झाला. माझ्यावर गुन्हा दाखल करणारे हे सरकारी गुंड आहेत. ३५३ चा आधार घेऊन जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. पण जनतेच्या हितासाठी मी शांत बसणार नाही तर सतत आग्रही राहणार. या एकूण प्रकरणातून जनतेने बोध घ्यावा. ३५३ चा आधार घेऊन असे गंभीर गुन्हे दाखल झाले तर सरकारी गुंडांना जाब विचारणारे कार्यकर्ते राहणार नाहीत. त्यामुळे ३५३ च्या बाबतीत सर्वांनीच आवाज उठवायला हवा, असेही खेडकर यांनी यावेळी म्हटले.

काय होते प्रकरण ?

२९ जून रोजी नवीन जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला मोठमोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, वैभव खेडेकर आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जगबुडी पुलाच्या जोड रस्त्याबाबतच्या निकृष्ट कामाला अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांना पुलाच्या रेलिंगला बांधलं होते. या प्रकरणामुळे ९ जुलै रोजी वैभव खेडेकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. २ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर वैभव खेडेकर न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यानच्या काळात पोलीस आणि नगरपालिकेच्या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे नगराध्यपदाचे अधिकार उपनगराध्यक्षांकडे दिले होते.

Intro:
वैभव खेडेकर यांचा अप्रत्यक्षरित्या पर्यावरण मंत्री रामदास कदमांवर आरोप

माझं नगराध्यक्ष पद काहींना अडचणीचं वाटत होतं - खेडेकर

माझं नगराध्यक्ष पद काढून, आपला माणूस त्या ठिकाणी बसवायचा आशा पद्धतीचं राजकारण झालं -- वैभव खेडेकर

रत्नागिरी, प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना दमदाटी आणि नवीन जगबुडी पुलाच्या रेलिंगला बांधल्याप्रकरणी अटकेत असलेले मनसे नेते आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची आज जामिनावर सुटका झाली. गेला महिनाभर ते अटकेत होते. दरम्यान कारागृहातून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. तसेच शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्षरीत्या आरोप केले. राजकीय षडयंत्र वापरून ही चळवळ दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला.. मी कुठेतरी त्यांना राजकारणात अडचणीचा ठरत होतो आणि माझं नगराध्यक्ष पद काहींना अडचणीचं वाटत होतं. त्यामुळे मला तीन महिने आत ठेवून माझं नगराध्यक्ष पद काढून घ्यायचं आणि आपला माणूस त्या ठिकाणी बसवायचा आशा पद्धतीचं राजकारण झाल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी केला आहे. दरम्यान जनतेचा आणि कुलस्वामिनीचा आशीर्वाद त्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या जोरावर बाहेर आलो अशी प्रतिक्रिया वैभव खेडेकर यांनी यावेळी दिली..
29 जून रोजी नवीन जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला मोठमोठी भगदाडे पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेकडून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं. दरम्यान वैभव खेडेकर आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जगबुडी पुलाच्या जोड रस्त्याबाबतच्या निकृष्ट कामाला अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांना पुलाच्या रेलिंगला बांधलं होतं. या प्रकरणामुळे 9 जुलै रोजी वैभव खेडेकर यांच्यासह काही कार्यकर्त्याना अटक करण्यात आली होती. 2 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर वैभव खेेडेकर न्यायालयीन कोठडीत होते.. दरम्यानच्या काळात त्यांचे नगराध्यक्षपदाचे अधिकार जिल्हाधिकारी यांनी पोलीस आणि नगर पालिकेच्या अहवालानंतर उपनगराध्यक्षांकडे दिले होते. दरम्यान वैभव खेडेकर यांना नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आज त्यांची रत्नागिरी विशेष कारागृहातून जामिनावर मुक्तता करण्यात आली. यावेळी मनसेचेे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते..

बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया देताना खेडेकर म्हणाले की मी वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी त्या ब्रिजवर गेलो होतो. 29 जून नंतर 2 जुलैला गुन्हा दाखल होतो, यामध्ये राजकारण येऊन सत्तेचा वापर करून माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला दाबण्याचा हा प्रकार झाला. माझ्यावर गुन्हा दाखल करणारे हे सरकारी गुंड आहेत. 353 चा आधार घेऊन जनतेचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. पण जनतेच्या हितासाठी मी शांत बसणार नाही, सतत आग्रही राहणार. पण एकूण प्रकरणातून जनतेने बोध घ्यावा. 353 चा आधार घेऊन असे गंभीर गुन्हे दाखल झाले तर सरकारी गुंडांना जाब विचारणारे कार्यकर्ते राहणार नाहीत. त्यामुळे 353 च्या बाबतीत सर्वांनीच आवाज उठवायला हवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली..

यावेळी त्यांनी शिवसेना नेते पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर नाव न घेता अप्रत्यक्षरित्या आरोप केले. मला जामीन मिळू नये, मी खडी फोडायला जावं, मनसेची वाटचाल थांबावी आशा पद्धतीचे अनेक प्रकार या ठिकाणी झाले. मी कुठेतरी त्यांना राजकारणात अडचणीचा ठरत होतो. राजकीय पटलावर माझं नगराध्यक्ष पद अडचणीचं वाटत होतं. म्हणून मला तीन महिने आत ठेवून माझं नगराध्यक्ष पद काढून घ्यायचं आणि आपला माणूस त्या ठिकाणी बसवायचा आशा पद्धतीचं राजकारण या ठिकाणी झाल्याचा आरोप वैभव खेडेकर यांनी यावेळी केला..

Byte - वैभव खेडेकर, नगराध्यक्ष आणि मनसे नेते
Body:वैभव खेडेकर यांचा अप्रत्यक्षरित्या पर्यावरण मंत्री रामदास कदमांवर आरोप

माझं नगराध्यक्ष पद काहींना अडचणीचं वाटत होतं - खेडेकर

माझं नगराध्यक्ष पद काढून, आपला माणूस त्या ठिकाणी बसवायचा आशा पद्धतीचं राजकारण झालं -- वैभव खेडेकरConclusion:वैभव खेडेकर यांचा अप्रत्यक्षरित्या पर्यावरण मंत्री रामदास कदमांवर आरोप

माझं नगराध्यक्ष पद काहींना अडचणीचं वाटत होतं - खेडेकर

माझं नगराध्यक्ष पद काढून, आपला माणूस त्या ठिकाणी बसवायचा आशा पद्धतीचं राजकारण झालं -- वैभव खेडेकर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.