रत्नागिरी - जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात माती वाहून आली आणि यात एका कंटेनरचा टायर फसला. यामुळे महामार्गावरिल वाहतूक ठप्प झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. अशात अवकाळी पावसाने हजेरी लावली. परशुराम घाटात पावसामुळे रस्त्यावर माती वाहून आली. यात एका कंटेनरचे टायर फसला. यामुळे मागील एक तासापासून या महामार्गावरिल वाहतूक ठप्प झाली आहे.
हेही वाचा - रत्नागिरीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क बंधनकारक, अन्यथा 500 रुपयांचा दंड