रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथील मिरकरवाडा बंदराला भेट देऊन, परिस्थितीची पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा देखील घेतला.
मच्छिमारांना सुरक्षीत स्थळी हलवण्याच्या सूचना
यावेळी त्यांनी सर्व मच्छिमारांना सुरक्षीत स्थळी हलवण्याच्या सूचना केल्या, तसेच प्रशासनाकडून आवश्यक असणारी सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी मच्छिमारांना दिले आहे. दरम्यान तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - जातीवाचक बोलल्याबद्दल अभिनेत्री मुनमुन दत्ता विरोधात मध्य प्रदेशात गुन्हा दाखल