ETV Bharat / state

Uday Samant supporters : उदय सामंत समर्थकांना पदावरून हटवले; सामंत यांच्या दौऱ्यानंतर नाट्यमय राजकीय घडामोडींना वेग

author img

By

Published : Jul 19, 2022, 12:22 PM IST

राज्यातील सत्तासंघर्षानंतर नवीन सरकार स्थापन झाले. शिवसेनेतील बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेत उभी फूट पडली. तरी शिवसेनेतील पडझड थांबायचे नाव घेत नाही. शिवसेना आणि शिंदे गटातील आमदारांमधील धुसफूस थांबायचे थांबत नाही. बंडखोर मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या दौऱ्यानंतर त्यांच्या समर्थकांची शिवसेनेने पदावरुन हकालपट्टी केली. तरीही शिवसेनेतील गळती थांबण्याचे थांबत नाही.

Upazila Chief Prakash Rasal
शिवसेना पदाधिकारी प्रकाश रसाळ व बापू म्हाप

रत्नागिरी : सत्तांतर नाट्यानंतर आमदार उदय सामंत यांचा शुक्रवारी रत्नागिरी दौरा झाला. या दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सामंत यांच्या स्वागताला हजेरी लावणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांना पदावरून हटविण्यात आले आहे. त्या जागी काहींच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पण, त्यातही शिवसेनेला पुन्हा एक झटका बसला आहे. सामंत समर्थक बाबू म्हाप यांच्याकडील उपजिल्हाप्रमुख पदाचा पदभार काढून ज्यांच्याकडे हा पदभार देण्यात आला, त्या नवनियुक्त उपजिल्हाप्रमुखांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला आहे.

प्रकाश रसाळ यांनी यांचा पदभार स्वीकारण्यास नकार : कौंटुंबिक आणि आरोग्याचे कारण देत प्रकाश रसाळ यांनी हा पदभार स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर काही दिवसांपूर्वी रत्नागिरी तालुका युवा अधिकारी म्हणून निवड झालेल्या वैभव पाटील यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नवीन नियुक्ती झाल्यानंतर काही तासांत शिवसेनेत झालेल्या राजीनामा नाट्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Letter from Prakash Rasal
प्रकाश रसाळ यांचे पत्र

नवनियुक्त तालुका युवा अधिकारी पाटील यांचाही राजीनामा : माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे उघड समर्थन करणाऱ्‍या रत्नागिरी तालुका युवा अधिकारी तुषार साळवी यांना पदावर हटवून त्यांच्या जागी मिरजोळे येथील तरुण शिवसैनिक वैभव पाटील यांची नियुक्ती काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, 8 दिवसांच्या आताच वैभव पाटील यांनी राजीनामा दिला आहे. कौटुंबिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचे पाटील यांनी जिल्हाप्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे.
उदय सामंत यांच्या दौऱ्यानंतर या घडामोडी घडत असल्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चा झडू लागल्या आहेत.

Letter from Vaibhav Patil
वैभव पाटील यांचे पत्र

सामंत समर्थकांना हटवून नवीन नियुक्त्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे माजी मंत्री आमदार उदय सामंत शुक्रवारी मतदारसंघात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेतील समर्थकांनी पालीसह रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात गर्दी केली होती. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांच्यासह प्रमुख पदाधिकारी दिसत होते. त्यांच्या दौर्‍यानंतर शिवसेनेकडून सामंत समर्थकांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेकडून नवीन नियुक्त्या सामनातून जाहीर : सामंतांच्या स्वागताला हजर असलेल्यांपैकी उपजिल्हाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, महिला संघटक कांचन नागवेकर यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी तत्काळ नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्याही शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून रविवारी जाहीर केल्या. त्यांच्या जागी शहर प्रमुख म्हणून प्रशांत साळुंखे, उपजिल्हा प्रमुख म्हणून प्रकाश रसाळ आणि महिला संघटक म्हणून साक्षी रावणंग यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले गेले.

शिवसेनेकडून झालेली कारवाई अपेक्षित असल्याची चर्चा : शिवसेनेकडून झालेली कारवाई अपेक्षित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. नवीन नियुक्तीसंदर्भात स्थानिक जुन्या शिवसैनिकांशी सल्लामसलतही झाली होती. रत्नागिरीतील इच्छुकांच्या नावांवर चर्चा झाल्यानंतर अंतिम नावे वरीष्ठांकडे कळविण्यात आली होती.

नवनियुक्त उपजिल्हाप्रमुखांचा पदभार स्वीकारण्यास नकार : दरम्यान, नवनियुक्तीचे वृत्त लोकांपर्यंत पोहचेपर्यंत उपजिल्हाप्रमुखपदी निवड झालेल्या प्रकाश रसाळ यांनी एका पत्राद्वारे पदावर काम करण्यास असमर्थ असल्याने राजीनामा देत असल्याचे जिल्हाप्रमुखांना कळवले आहे. रविवारी सकाळी नियुक्ती जाहीर झाल्यानंतर काही तासांतच नियुक्ती नाकारल्यामुळे शिवसेनेलाच धक्का बसला आहे. रसाळ यांनी जिल्हाप्रमुख विलास चाळकेंना दिलेल्या पत्रात प्रकृती आणि कौटुंबिक समस्येमुळे पद स्वीकारू शकत नसल्याचं नमूद केले आहे.

हेही वाचा : Shiv Sena MP rebellion: खासदारांच्या बंडखोरीची कल्पना उद्धव ठाकरेंना होती - विनायक राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.