ETV Bharat / state

कोणी ऐरागैरा माझा राजकीय अस्त करू शकत नाही, उदय सामंतांचा निलेश राणेंना टोला - NILESH RANE

मला ३ वेळा या मतदारसंघातील लोकांनी फार मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. माझा जर राजकीय अस्त करायचा असेल तर ते मतदार करू शकतात.

शिवसेना आमदार उदय सामंत
author img

By

Published : Apr 13, 2019, 12:59 PM IST

रत्नागिरी - कोणी ऐरागैरा माझा राजकीय अस्त करू शकत नाही, असे प्रत्युत्तर म्हाडा अध्यक्ष आणि आमदार उदय सामंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांना दिले आहे.

शिवसेना आमदार उदय सामंत यांची प्रतिक्रिया

रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची सर्व टीम आणि सामंत कंपनी निवडणुकीत निलेश राणेला बाद करायला निघाली आहे. पण निलेश राणेला बाद करणे एवढे सोपे नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंतचाच अस्त करू, अशी टीका निलेश राणे यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हाडा अध्यक्ष आणि आमदार उदय सामंत पत्रकार परिषदेत म्हणाले, की राणेंचे वक्तव्य बालिश आहे.

मला ३ वेळा या मतदारसंघातील लोकांनी फार मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. माझा जर राजकीय अस्त करायचा असेल तर ते मतदार करू शकतात. कोणी ऐरागैरा माझा राजकीय अस्त करू शकत नाही, हे माझे प्रामाणिक मत आहे, असेही उदय सामंत यावेळी म्हणाले.

पोलिसांबरोबर संगनमत असल्याचा आरोप म्हणजे राज्यातील सर्वच पोलिसांचा तो अपमान आहे. राजकारण व्यक्तिगत पातळीवर करा पण पोलिसांना बदनाम करू नये, असा टोलाही सामंत यांनी निलेश राणे यांना लगावला.

Intro:कोणी ऐरागैरा माझा राजकीय अस्त करू शकत नाही
उदय सामंत यांचा निलेश राणेंना टोला

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोणी ऐरागैरा माझा राजकीय अस्त करू शकत नाही असं टोला लगावत म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते..
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची सर्व टीम आणि सामंत कंपनी निवडणुकीत निलेश राणेला बाद करायला निघाली आहे.. पण निलेश राणेला बाद करणं एवढं सोपं नसून येत्या 2019 च्या विधानसभा निवडणूकित उदय सामंतचाच अस्त करू अशी टीका निलेश राणे यांनी केली होती.. या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत आज पत्रकार परिषदेत म्हणाले की त्यांचं हे वक्तव्य म्हणजे बालिश वक्तव्य आहे. मला तीन वेळा या मतदार संघातील लोकांनी फार मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आहे..आणि माझा जर राजकीय अस्त करायचा असेल तर ते मतदार करू शकतात कोणी ऐरागैरा माझा राजकीय अस्त करू शकत नाही, हे माझं प्रामाणिक मत असल्याचं उदय सामंत यावेळी म्हणाले..
दरम्यान पोलिसांबरोबर आपलं संगनमत असल्याचा आरोप म्हणजे राज्यातील सर्वच पोलिसांचा तो अपमान आहे.. राजकारण व्यक्तिगत पातळीवर करा पण पोलिसांना बदनाम करू नये असाही टोला समंत यांनी निलेश राणे यांना यावेळी लगावला..
दरम्यान रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांचा अडीच ते तीन लाख मताधिक्याच्या फरकाने विजय होईल.. तसेच सिंधुदुर्गतून त्यांना एक लाखाचं मताधिक्य जास्त मिळेल असा विश्वासही सामंत यांनी यावेळी व्यक्त केला..

Byte -- उदय सामंत, म्हाडा अध्यक्ष, आमदारBody:कोणी ऐरागैरा माझा राजकीय अस्त करू शकत नाही
उदय सामंत यांचा निलेश राणेंना टोला
Conclusion:कोणी ऐरागैरा माझा राजकीय अस्त करू शकत नाही
उदय सामंत यांचा निलेश राणेंना टोला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.