ETV Bharat / state

उदय सामंत यांच्याकडून बाळ माने यांना शिवसेनेत येण्याचे आमंत्रण

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोळप येथील प्रचार सभेत बोलताना सामंत यांनी बाळ माने यांना शिवसेनेत येण्याचे खुले आमंत्रण दिले. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Samant
Samant
author img

By

Published : Jan 13, 2021, 4:24 PM IST

Updated : Jan 13, 2021, 8:21 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील भाजपाचे नेते आणि माजी आमदार बाळ माने यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर शिवसेना प्रवक्ते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोळप येथील प्रचार सभेत बोलताना सामंत यांनी बाळ माने यांना शिवसेनेत येण्याचे खुले आमंत्रण दिले. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोप

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठीची शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच लढत सुरू आहे. मात्र या सर्व राजकीय घडामोडीमध्ये भाजपाचे माजी आमदार बाळ माने पुन्हा प्रवाहात आले. बाळ माने यांनी म्हटले होते, की मंत्री सामंत आणि पालकमंत्री यांच्या विरोधात ग्रामीण भागात प्रचंड नाराजी आहे. त्या नाराजांच्या मागे मी उभा राहणार आहे. जुने-नवे वाद उफाळल्याने त्याचा फायदा भाजपला नक्की ग्रामपंचायत निवडणुकीत मिळेल, असे माने यांनी म्हटले होते.

'माने सुसंस्कृत नेत्यांपैकी एक'

याला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, की भाजपाचे माजी आमदार बाळ माने सुसंस्कृत नेत्यापैकी एक आहेत. बाळ माने माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी कधी मारामारी केली नाही. अनेकदा मी त्यांचा सल्ला ऐकला आहे; मात्र पक्षात सध्या त्यांचा निवडणुकीपुरता वापर केला जात आहे. त्यांची घुसमट आम्ही समजू शकतो. तालुक्यात आणि जिल्ह्यात बाळ माने यांना मानणारे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. ते सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य करतात.

'माने यांनी शिवसेनेत यावे'

बाळ मानेंना बाजूला करण्यासाठी अनेक षड्यंत्र केली जात आहेत. त्यामुळे त्यांची घुसमट आम्ही समजू शकतो. पक्षांतर्गत विरोधकांसोबत राहण्यापेक्षा त्यांनी आमच्यासोबत यावे, संपूर्ण पक्षाची ताकद त्यांच्यामागे उभी करू. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात बाळ माने यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारू, असे अशा शब्दात माने यांना शिवसेनेत येण्याचे खुले निमंत्रण सामंत यांनी दिले. दरम्यान सामंत यांनी बाळ माने यांना थेट सेनेत येण्याचे आवताण दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Last Updated : Jan 13, 2021, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.