रत्नागिरी - जिल्ह्यातील हर्णै येथे समुद्रकिनारी २ मोठे कासव मृत अवस्थेत सापडल्याने कासवप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे. हर्णै पाजपंढरीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या समुद्रकिनारपट्टीलगत पुळणीवर हे कासव मृत अवस्थेत आढळून आले.
आंजर्ले येथे १५ मार्चपासून कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मात्र २ कासव मृतावस्थेत सापडल्याने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, याची माहिती कळताच घटनास्थळी हर्णै ग्राम पाणीपुरवठा कमिटीचे अध्यक्ष असलम अकबानी यांनी पाहणी केली. त्यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यानंतर मोठा खड्डा काढून दोन्ही कासवांना पुरण्यात आले. तसेच घटनास्थळी दापोली वनरक्षक सुरेखा जगदाळे यांनी भेट देऊन पाहणी केली.
हे दोन्हीही कासवं ऑलिव्ह रिडले या जातीची असून एकाचे वजन साधारण अंदाजे ३५ किलो होते.