रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत (75 years of Indian Independence) आहेत. यानिमित्ताने भारताच्या देदीप्यमान इतिहासाचे संस्मरण करण्यासाठी दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) हे अभियान (Har Ghar Tiranga Abhiyan) राबवण्यात येत आहे. रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देण्यासाठी सहकार्य करायचे ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावतीने प्रभाग ५ मध्ये १००१ राष्ट्रध्वज घरोघरी जाऊन (Tricolor reaching 1001 homes in Ratnagiri) मोफत वाटण्यात येत आहेत.
'हर घर तिरंगा' या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून; जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे. प्रशासनाकडून १००१ झेंडे विकत घेऊन, सौरभ मलुष्टे ते घरोघरी मोफत वाटणार आहेत. प्रभागातील नागरिकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या राष्ट्रध्वजासोबत एक पत्रक देखील देण्यात येत आहे. यात राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम आणि सूचना देण्यात आल्या आहेत.
तरुण उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असणाऱ्या सौरभ मलुष्टे यांनी, आजवर शासन लोकहिताचे अनेक उपक्रम राबवले आहेत. जेष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम घेऊन त्यांनी नागरिकांची वाहवा मिळवली होती. मदतीची भावना ठेऊन आजवर अनेक गरजूंच्या मदतीला सौरभ मलुष्टे धाऊन गेले आहेत. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता लोकांच्या हाकेला धावून जाणारा एक सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. आपल्या या कीर्तीला साजेसे असे काम करीत, घरोघरी राष्ट्रध्वज पोहचवण्याचा अभिनव उपक्रम आज त्यांच्याकडून होत आहे.