रत्नागिरी - एसटी रुळावर आण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. नगर येथे झालेली कर्मचाऱ्याची आत्महत्या दुर्दैवी आहे. याबाबत मी त्यांच्या कुटुंब यांच्याशी बोललो आहे. कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आपले आवाहन असल्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी म्हटले. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
आत्महत्या हा त्यावरचा मार्ग नाही - अनिल परब
अहमदनगर जिल्ह्यात एका एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत असलेल्या दिलीप काकडे यांनी शेवगाव आगारात उभ्या असलेल्या बसच्या मागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत बोलताना अॅड. परब म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत काहीवेळा दिरंगाई होत आहे. काहीवेळा पगार वेळेवर होत नाहीत. त्यामुळे आत्महत्या होताहेत. मात्र, आतापर्यंत 2600 कोटी आणि कालचे 132 कोटी शासनाकडून आणून मी त्यांचे पगार केले आहेत. मला या गोष्टीची जाणीव आहे की पगार द्यायला थोडा उशीर होत आहे. मात्र, त्यांचा प्रत्येक पै आणि पै मी त्यांना देण्यात येत आहे.
हेही वाचा - सहा पीक विमा कंपन्यांना दणका; राज्य सरकारची नोटीस
अहमदनगरमधील ही घटना दुर्दैवी आहे. मी त्यांच्या नातेवाईकांशीही सकाळी बोललो. त्यांना सर्वोतोपरी आपण मदत करत आहोत. एसटी रुळावर आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मात्र, आत्महत्या हा त्यावरचा मार्ग नाही. त्यामुळे असे टोकाचे पाऊल कोणी उचलू नये, असे आवाहन परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी केले.