रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण २ जुलैच्या रात्री फुटले आणि एकच हाहाकार उडाला. त्यानंतर सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. मात्र, प्रशासनाने वेळीच लक्ष दिले असते, तर ही दुर्घटना टळली असती, अशी प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी दिली.
तिवरे धरणाला गळती लागली होती. या बाबत स्थानिक नागरिक अजित चव्हाण यांनी चिपळूणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहले होते. मात्र, मुर्दाड प्रशासनाने फक्त कागदी घोडे नाचवण्यातच धन्यता मानली. आणि ज्याने पत्रव्यवहार केला त्याच्याच घरातील पाच जणांना जीव गमवावा लागला. नेमका हा काय पत्रव्यवहार आहे, अजित चव्हाण यांच्या पत्राला प्रशासनाने नेमके काय उत्तर दिले. पाहुया हा रिपोर्ट.....