ETV Bharat / state

नदीत उडी मारून पळालेला चोरटा अखेर जेरबंद - महाड-बिरवाडी एमआयडीसी

सिने स्टाईलने पोलिसांना गुंगारा देऊन पळालेल्या चोरट्याला खेड पोलिसांनी अटक केली आहे.

नदीत उडी मारून पळालेला चोरटा अखेर जेरबंद
author img

By

Published : Jul 16, 2019, 9:00 AM IST

रत्नागिरी- नदीत उडी मारून पळालेल्या चोरट्याला खेडमधील मोरवडे गावानजिक पकडण्यात आले आहे. दोन दिवस हा चोरटा पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. रायगड जिल्ह्यातील महाड-बिरवाडी एमआयडीसी येथे दरोडा टाकून चोरटे खेडच्या दिशेने पसार झाले होते. यातील दोन अट्टल चोरट्यांना खेड पोलिसांनी सिने स्टाईलने पाठलाग करून शनिवारी पकडले होते. यापैकी एक चोरटा नदीत उडी मारून पसार झाला होता. चोरट्याने नदीत उडी मारल्याने पोलीस देखील चक्रावले. हा चोर नदीच्या मध्यभागी असलेल्या एका झाडाला पकडून नदीतच थांबला, हे पाहून पोलिसही या चोरट्याला पकडण्यासाठी नदीत उतरले होते. मात्र, नदीच्या दोन्ही बाजूने पोलीस पाण्यात उतरले हे पाहून चोरट्याने ते झाड सोडले. तो पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला. नदीच्या काठाचा आधार घेऊन पुढे हा चोरटा जंगलात पळून गेला होता. अखेर या चोरट्याला पकडण्यात खेड पोलिसांना सोमवारी यश आले.

Intro:
नदीत उडी मारून पळालेला चोरटा अखेर जेरबंद

रत्नागिरी, प्रतिनिधी

नदीत उडी मारून पळालेल्या चोरट्याला खेडमधील मोरवडे गावानजीक पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. दोन दिवस हा चोरटा पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. रायगड जिल्ह्यातील महाड - बिरवाडी एमआयडीसी येथे धाडसी दरोडा टाकून चोरटे खेडच्या दिशेने पसार झाले होते. यातील दोन अट्टल चोरट्यांना खेड पोलिसांनी सिने स्टाईलने पाठलाग करून शनिवारी पकडले होते. मात्र एक चोरटा नदीत उडी मारून पसार झाला होता.. नदीतच उडी मारल्याने पोलीस देखील चक्रावले. दरोडेखोर नदीच्या मध्यभागी असलेल्या झाडाला पकडून नदीत तसाच तिथे राहिला होता आणि पोलीसही या चोरट्याला पकडण्यासाठी चक्क नदीच उतरले होते. मात्र नदीच्या दोन्ही बाजूने पोलीस पाण्यात उतरले हे पाहून चोरट्याने ते झाड सोडलं. आणि पाण्याच्या प्रवासोबत वाहत गेला. आणि नदीच्या काठचा आसरा घेऊन चोरटा जंगलात पळून गेला होता. अखेर या चोरट्याला पकडण्यात खेड पोलिसांना आज यश आलं आहे.Body:नदीत उडी मारून पळालेला चोरटा अखेर जेरबंदConclusion:नदीत उडी मारून पळालेला चोरटा अखेर जेरबंद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.