रत्नागिरी - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मंडणगड तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे येथे भेट दिली ( President Kovind Visited Ambadave ) आहे. यावेळी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट ( President Ram Nath Kovind In Ratnagiri ) दिली. त्यानंतर गावातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिरालाही त्यांनी भेट दिली. त्यानंतर कार्यक्रमात मराठीतून त्यांनी भाषण सुरु ( President Speech Started In Marathi ) केले.
रत्नागिरी जिल्ह्याचा गोडवा संपूर्ण देशात पसरेल
त्यानंतर झालेल्या भाषणात ते म्हणाले की, हे स्थान असं आहे, इथे आल्यावर कोणीही भावूक होतो. इथल्या आंब्याचा गोडवा जगभरात पोहचला आहे. इथल्या लोकांच्या वाणीत, वागण्यात गोडवा आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा गोडवा संपूर्ण देशात पसरेल. आंबडवेची यात्रा मला तीर्थक्षेत्रासमान आहे. पावले ती धन्य होती ध्यास पंथे चालता, अशा शब्दात राष्ट्रपतींनी भावना व्यक्त केल्या.
मोठा पोलीस फौजफाटा
राष्ट्रपती मंडणगडमध्ये येत असल्याने मोठा पोलीस फौजफाटा तालुक्यात तैनात केला आहे. राष्ट्रपती दौऱ्याच्या निमित्ताने सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाने मोठी तयारी केली आहे. बंदोबस्तासाठी 118 पोलीस अधिकारी, 800 पोलीस अंमलदार, 200 होमगार्ड असा 1 हजार 118 जणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच जलद कृतीदल, दंगाकाबू पथके, एसआरपीएफ तुकड्या, बॉम्बशोधक पथके हे देखील दिमतीला आहेत.
आंबडवे गावाला भेट देणारे पहिलेच राष्ट्रपती
आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रपती मंडणगडात येत असून, आंबडवे गावाला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रपती ठरणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपतींनी मंडणगड तालुक्याला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.