ETV Bharat / state

रिफायनरी प्रकल्प : समर्थकांची शरद पवारांशी भेट घडवून देण्याचे तटकरेंचे आश्वासन - Refinery project supporter Roha

प्रकल्प समर्थकांच्या रत्नागिरी व राजापुरातील एका संयुक्त शिष्टमंडळाने रोहा येथे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी समर्थकांची भेट घडवून देण्याची मागणी करण्यात आली. येत्या काही दिवसात अशी भेट घडवून देण्याचे अभिवचन तटकरे यांनी शिष्टमंडळाला दिले.

Refinery project supporters visit Tatkare
रिफायनरी प्रकल्प समर्थक तटकरे भेट
author img

By

Published : Jan 31, 2021, 6:18 PM IST

रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्पाला दिवसेंदिवस समर्थन वाढत आहे. अनेक संघटना हा प्रकल्प राजापूरमध्येच व्हावा, यासाठी पुढे येत आहेत. दरम्यान, प्रकल्प समर्थकांच्या रत्नागिरी व राजापुरातील एका संयुक्त शिष्टमंडळाने रोहा येथे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी समर्थकांची भेट घडवून देण्याची मागणी करण्यात आली. येत्या काही दिवसात अशी भेट घडवून देण्याचे अभिवचन तटकरे यांनी शिष्टमंडळाला दिले.

खासदार तटकरे यांची भेट घेताना शिष्टमंडळ

हेही वाचा - ताटातूट झालेल्या मादी बिबट्या अन् तिच्या बछड्यांची वनविभागाने घडवली भेट

पवार साहेबांशी भेट घडवून देऊ - तटकरे

रत्नागिरी दौऱ्यावर आलेले खासदार सुनील तटकरे यांनी प्रकल्प समर्थकांची शरद पवार यांच्याशी भेटीसाठी आपण दुवा बनू शकतो, असे वक्त्तव्य करून समर्थकांना दिलासा दिला होता. त्या अनुषंगाने रोहा सुतारवाडी येथील निवासस्थानी प्रकल्प समर्थकांच्या रत्नागिरी व राजापुरातील संयुक्त शिष्टमंडळाने तटकरे यांची भेट घेतली. भेटीत तटकरे यांनी येत्या दोन दिवसात आपली दिल्ली येथे पवार यांच्याशी भेट होणार असून त्यांच्याशी चर्चालाप करून लवकरच मुंबईत समर्थकांची त्यांच्याशी भेट घडवून देण्याबाबत नियोजन केले जाईल, असे आश्वासन दिले.

रिफायनरी प्रकल्पासाठी वाढले समर्थन

रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाच्या लढ्याला सध्या मोठी गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी राजापूरमधील 45 संघटना एकत्रित आल्या आहेत. तर, रत्नागिरीतील 50 संघटना देखील एकवटल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट मिळावी यासाठी प्रकल्प समर्थक संघटनेकडून मुख्यमंत्री कार्यालयाला मेलही करण्यात आला आहे. मात्र, अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे, प्रकल्प समर्थकांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

तटकरे यांना भेटलेल्या शिष्टमंडळात राजापुरातील रिफायनरी प्रकल्प समन्वय समितीचे अध्यक्ष अ‌‍‌‌ॅ‌‌‌ड. शशिकांत सुतार, तसेच पदाधिकारी पंढरीनाथ आंबेरकर, दर्यावर्दी मच्छीमार संस्था कातळीचे अध्यक्ष जैनुद्दीन फणसोपकर, विद्याधर राणे, अॅड. यशवंत कावतकर, महेश शिवलकर, तसेच रत्नागिरीतील समितीचे अध्यक्ष केशव भट, पदाधिकारी टी.जी. शेट्ये, बशीर मुर्तझा, आनंद जोशी, राजीव कीर, राकेश नलावडे, राजेश शेट्ये, अथर्व शेट्ये, नित्यानंद भुते आदी सहभागी होते.

हेही वाचा - आयकर, जीएसटीच्या किचकट तरतुदींविरोधात व्यापारी, करसल्लागारांचे आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.