ETV Bharat / state

नाणार प्रकल्प सुरू करा; अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सची शिफारस - Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत या टास्क फोर्सची चर्चा झाली. यावेळी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची शिफारस या टास्क फोर्सने केली आहे. राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क सहासंचालनालयच्या 'महासंवाद'च्या या अधिकृत वेब पेजवर ही माहिती आहे. त्यामुळे आता रिफायनरी प्रकल्पला समर्थन करणाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Task Force Recommendation, Start the Nanar Refinery project
नाणार प्रकल्प सुरू करा; अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नेमलेल्या टास्क फोर्सची शिफारस
author img

By

Published : Aug 26, 2020, 4:55 PM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची शिफारस राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सने केली आहे. अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी, ठाकरे सरकारने नेमलेल्या टास्क फोर्सने ही शिफारस केली आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष विजय केळकर यांच्यासह अन्य दिगग्ज मंडळी या टास्क फोर्समध्ये आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत या टास्क फोर्सची चर्चा झाली. यावेळी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची शिफारस या टास्क फोर्सने केली आहे. राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क सहासंचालनालयच्या 'महासंवाद'च्या या अधिकृत वेब पेजवर ही माहिती आहे. त्यामुळे आता रिफायनरी प्रकल्पला समर्थन करणाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

महाराष्ट्राचा विकास दर कसा उंचवावा तसेच अर्थव्यवस्थेला कसा वेग द्यावा, या संदर्भात पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या सदस्यांसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली व अर्थतज्ज्ञांच्या शिफारशी ऐकून घेतल्या.

यावेळी चर्चेत टास्क फोर्समधील विजय केळकर यांनी रिफायनरी बोलताना सांगितले की, कोकण रिफायनरीला सुरु करावे, जेणेकरून 1 लाख रोजगार मिळेल तसेच 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल. चेंबूर येथील रिफायनरी देखील त्यामुळे हलविता येईल आणि मुंबईत त्या जागेवर आणखी काही चांगले विकसित करता येईल.

दरम्यान, स्थानिक लोक प्रकल्पाच्या बाजूने असतील तर सरकार प्रकल्पांना मंजुरी देईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक पुनरूच्चाराने प्रकल्प समर्थक, स्थानिक शेतकरी व जमीन मालक यांना उभारी मिळाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

हेही वाचा - गौरीमातेचं पारंपरिक पद्धतीने आगमन, कोरोनाचं संकट असलं तरी महिलांचा उत्साह काय

हेही वाचा - संरक्षक जाळी तुटून विहिरीत पडला बिबट्या; वनविभागाने दिले जीवदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.