ETV Bharat / state

१० हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले - anti corruption bureau ratnagiri

जमिनीच्या सातबाऱ्यावर नावाची नोंदणी करण्यासाठी १० हजाराची लाच मागणाऱ्या प्रभाकर भीमराव सोनवणे या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

ratnagiri
१० हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले
author img

By

Published : Jan 1, 2020, 3:15 PM IST

रत्नागिरी - सात बाऱ्याच्या उताऱ्यावर नोंद घालण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना दापोली तालुक्यातील केळशी येथील तलाठी प्रभाकर भीमराव सोनवणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

या प्रकरणातील तक्रारदाराने केळशी येथील जमीन घरासह ६ डिसेंबर २०१८ रोजी खरेदी खताने केली होती. खरेदी खताच्या कागद पत्रांप्रमाणे त्या जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर होऊन त्यांचे नाव लागण्यासाठी जमिनीचे खरेदी खताचे पेपर आरोपी तलाठी प्रभाकर सोनवणे याच्याकडे दिले होते. या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदारांनी दापोली तहसीलदार कार्यालय आंजर्ले येथील मंडळ अधिकारी प्रीतम कासारे आणि तलाठी सोनवणे या दोघांची भेट घेतली. यावेळी या दोघांनी १५ हजार रुपयांची मागणी केली. ती रक्कम दिल्याशिवाय तक्रारदार यांचे काम करणार नसल्याचे सांगितले.

यामुळे सदर तक्रारदार यांनी या २६ डिसेंबर २०१९ रोजी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांचेकडे दिली. सदर तक्रारीच्या अनुषंगाने २६ डिसेंबर २०१९ रोजी करण्यात पडताळणी कारवाईमध्ये तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर त्याच्या नावाची नोंद करण्यात आली. त्यांनतर लाच स्वरुपातील १५ रुपयांची मागणी ही तडजोडीअंती १० हजार रुपयापर्यंत स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले.

हेही वाचा - 12 सागरी मैलाच्या आतील पर्ससीन मासेमारीवर बंदी

मंगळवारी पैसे देण्याचे ठरले, त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. दापोलीतल्या हॉटेल गुरुप्रसाद येथे तलाठी सोनवणे यांनी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर दापोलीच्या तहसील कार्यालय आवारातील तलाठी संगणक भवनामध्ये पंचासमक्ष त्यांला रंगेहाथ पकडण्यात आले. सदरची सापळा कारवाई पोलीस निरीक्षक कदम व त्यांचे पथक पोलीस हवालदार संदीप ओगले, पोलीस नाईक योगेश हुंबरे, पोलीस शिपाई दिपक आंबेकर व राजेश गावकर यांनी केली आहे.

हेही वाचा - रत्नागिरीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत

Intro:
10 हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

रत्नागिरी, प्रतिनिधी

तलाठ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. सात बाऱ्याच्या उताऱ्यावर नोंद घालण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना दापोली तालुक्यातील केळशी येथील तलाठी
प्रभाकर भिमराव सोनवणे यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
या प्रकरणातील तक्रारदाराने केळशी येथील जमिन गट नं . ८६ / १३ / १ व ८६ / १२ क्षेत्र ४ . ८० गुंठे हि जमिन घरासह दिनांक १२ / ०६ / २०१८ रोजी खरेदी खताने खरेदी केली होती . खरेदी खताचे पेपरप्रमाणे त्या जमिनीची नोंद सातबारा उताऱ्यावर होवून त्यांचे नाव लागणेसाठी जमिनीचे खरेदीखताचे पेपर आरोपी तलाठी प्रभाकर सोनवणे यांच्याकडे दिले होते. या कामाचा पाठपुरावा करणेसाठी तक्रारदार यांनी दापोली तहसिलदार कार्यालय येथे आंजर्ले येथील मंडळ अधिकारी प्रीतम कासारे आणि तलाठी सोनवणे या दोघांची भेट घेतली. यावेळी या दोघांनी १५००० रूपये लाच रक्कमेची मागणी करून , ती रक्कम दिल्याशिवाय तक्रारदार यांचे काम करणार नसल्याचे सांगितले . म्हणुन तक्रारदार यांनी या २६ / १२ / २०१९ रोजी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांचेकडे दिली होती . सदर तक्रारीचे अनुषंगाने दिनांक २६ / १२ / २०१९ रोजी करण्यात पडताळणी कारवाईमध्ये हे दोघेही तक्रारदार यांचेकडे त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीची ७ / १२ उताऱ्यावर नोंद करून , ७ / १२ उतारा देण्यासाठी त्यांचेकडे १५ , ००० / - रुपये लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती १० , ००० / - रूपये स्विकारण्याचे मान्य केले.

त्यानुसार आज सापळा रचण्यात आला. दापोलीतल्या हॉटेल गुरुप्रसाद येथे तलाठी सोनवणे यांनी 10 हजार रुपयांची लाच स्विकारल्यानंतर दापोलीच्या तहसील कार्यालय आवारातील तलाठी संगणक भवनामध्ये पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आलं.. सदरची सापळा कारवाई पोलीस निरीक्षक श्री . कदम व त्यांचा स्टाफ पोलीस हवालदार संदीप ओगले , पोलीस नाईक योगेश हुंबरे , पोलीस शिपाई दिपक आंबेकर व राजेश गावकर यांनी केली आहे.Body:
10 हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडलेConclusion:
10 हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.