ETV Bharat / state

कोल्हापुरातून रत्नागिरीत आलेल्या औषधसाठ्याची कसून चौकशी; कागदपत्रांच्या अभावामुळे संशय

कोरोनामुळे निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीत प्रशासन सतर्क झाले आहे. सोमवारी रात्री कोल्हापूर येथून रत्नागिरीत औषधे घेऊन आलेल्या दोन गाड्या पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतल्या होत्या. त्या गाडीत औषधाचे सुमारे 28 बॉक्स आढळले आहेत.

suspicious medicine carrying trucks
कोल्हापुरातून रत्नागिरीत आलेल्या औषध साठ्याची कसून चौकशी; कागदपत्रांच्या अभावामुळे संशय
author img

By

Published : Oct 6, 2020, 1:19 PM IST

रत्नागिरी - कोल्हापुरातून औषधाचा साठा घेऊन आलेल्या दोन संशयास्पद गाड्यांची जिल्हा प्रशासनाकडून कसून चौकशी सुरू आहे. औषधाच्या या दोन्ही गाड्या खासगी ट्रान्स्पोर्टच्या आहेत. संबंधित औषधे नक्की कोणी मागवली आहेत, याबाबत प्रशासन तपासणी करत आहे.

कोल्हापुरातून रत्नागिरीत आलेल्या औषध साठ्याची कसून चौकशी; कागदपत्रांच्या अभावामुळे संशय

कोरोनामुळे निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीत प्रशासन सतर्क झाले आहे. सोमवारी रात्री कोल्हापूर येथून रत्नागिरीत औषधे घेऊन आलेल्या दोन गाड्या पोलिसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतल्या होत्या. त्या गाडीत औषधाचे सुमारे 28 बॉक्स आढळले आहेत. याची चौकशी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन आणि तहसीलदार कार्यालय आदी यंत्रणांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

खासगी ट्रॉन्स्पोर्टवाल्यांकडे औषध पुरवण्याची पावती आहे; परंतु ती मागणी कोणी केली आहे, याबाबतचा तपशील नाही. त्यामुळे एवढा मोठा साठा कोणी व कशासाठी मागवला, याची खात्री यंत्रणा करत आहे. पुरवठादार आणि मागणीधारक यांची माहिती मिळाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.