ETV Bharat / state

ST Worker Death in Rajapur : निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मृतदेह घेण्यास नातेवाईकांचा नकार - निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचार्‍यांचा संप ( Rajapur ST employee strike update ) सुरू आहे. या संपात सहभागी झालेले राकेश बांते यांचा बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ( Rakesh Bante death in Ratnagri ) झाला. ते राजापूर आगारामध्ये चालक आणि वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत होते.

एसटी कर्मचारी मृत्यू
एसटी कर्मचारी मृत्यू
author img

By

Published : Dec 23, 2021, 11:46 PM IST

Updated : Dec 24, 2021, 3:50 AM IST

रत्नागिरी - राजापूर आगारातील आंदोलन करणाऱ्या निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू ( Rajapur ST Depo Employee death in Rajapur ) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राकेश रमेश बांते (वय 35) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे बुधवारी रात्री सुमारे साडेदहा वाजता निधन ( ST employee heart attack in Ratnagiri ) झाले.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचार्‍यांचा संप ( Rajapur ST employee strike update ) सुरू आहे. या संपात सहभागी झालेले राकेश बांते यांचा बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ( Rakesh Bante death in Ratnagri ) झाला. ते राजापूर आगारामध्ये चालक आणि वाहक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत होते.

राकेश यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार

हेही वाचा-HC on ST Workers Strike : एसटीच्या विलीनीकरणाबाबत पुढील सुनावणी 22 डिसेंबरला, प्राथमिक अहवाल दिशाभूल करणारा - सदावर्ते

एसटी कर्मचारी व कुटुंबीय आक्रमक, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

राकेश बांते यांच्या मृत्यूने त्यांच्या पत्नीने व आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी राकेश यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणी आगार प्रमुखांच्या विरोधात सदोष मन्युष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राकेश यांची पत्नी भाग्यश्री बांते यांनी ( Rakesh Bante wife demand to gov ) केली आहे. तर बांते यांच्या पत्नी व दोन्ही मुलांच्या संगोपनाबाबत प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर ( Rajapur PI Janardan Parabkar ) यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

हेही वाचा-MSRTC Strike : ठाकरे सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध मेस्मा लावण्याच्या हालचाली, अनिल परब म्हणतात..

महिन्याच्या सुरूवातीला संपात सहभागी झालेल्या राकेश यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती. बुधवारी (22 डिसेंबर) काहीसे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना राजापूरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामध्ये त्यांचे निधन झाले.

हेही वाचा-mumbai omicron update - मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे ५ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा ३६ वर

माझ्या पतीच्या मृत्युस राजापूर आगार व्यवस्थापकच जबाबदार

राकेश बांते यांच्या मृत्यूने बांते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पतीच्या मृत्यूला राजापूर आगार व्यवस्थापकच जबाबदार असल्याचा आरोप भाग्यश्री बांते यांनी केला आहे. या प्रकरणात राजापूर आगार व्यवस्थापक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल यावा, अशी मागणी भाग्यश्री बांते यांनी केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात चालू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या दुखवट्यात पती सामील होते. यामुळे त्यांच्यावर आगार व्यवस्थापक राजापूर यांनी निलंबनाची कारवाई केलेली होती. तेव्हापासून ते मानसिक दडपणाखाली होते. त्यामुळे माझ्या पतीच्या मृत्यूला राजापूर आगार व्यवस्थापक हेच जबाबदार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी राकेश यांची पत्नीने निवेदनातून केली आहे.

एसटी संपावर न्यायालय 5 जानेवारीला घेणार सुनावणी-
एसटी संपावर उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये ( Bombay High Court on ST strike ) सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून अनिश्चितकालीन दुखवटा कोणालाही करता येणार नाही, असे खडेबोल न्यायालयाने कर्मचाऱ्यांना सुनावले आहे. तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मात्र, अनिश्चित काळ दुखवटा पाळता येणार नाही. त्यामुळे, जे कामगार हजर होत नाही, त्यांच्या विरोधात अवमान याचिकेतील तरतुदीची माहिती एसटी आगारात लावावीत, असे थेट आदेशच मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच, सुनावणी राखून ठेवत पुढील सुनावणी 5 जानेवारीला होणार आहे.

Last Updated : Dec 24, 2021, 3:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.