ETV Bharat / state

उद्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी व शास्त्री पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट, 'या' वेळेत वाहतूक असेल बंद

author img

By

Published : Sep 9, 2020, 3:42 PM IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलांच्या करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात चिपळूणमधील वाशिष्ठी आणि संगमेश्वरमधील शास्त्री पूल सद्यास्थितीत अतिधोकादायक असल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर आता पुणे येथील स्टक्ट सोर्स इंजिनिअरींगच्या माध्यमातून या दोन्ही पुलांचे स्पेशल स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे.

पूल
पूल

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील पूल आणि संगमेश्वर येथील शास्त्री पुलाच्या सुरक्षिततेसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. उद्यापासून (१० सप्टेंबर) १२ सप्टेंबरपर्यंत हे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी दुपारी १२ ते ४ या वेळेत पुलावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद केली जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. वाहतुकीसाठी पर्यायही यामध्ये सुचविले आहेत.

पुलाचे दृश्य

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिटिशकालीन पुलांच्या करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात चिपळूणमधील वाशिष्ठी आणि संगमेश्वरमधील शास्त्री पूल सद्यास्थितीत अतिधोकादायक असल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर आता पुणे येथील स्टक्ट सोर्स इंजिनिअरींगच्या माध्यमातून या दोन्ही पुलांचे स्पेशल स्ट्रक्चरल ऑडिट केले जात आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी पुलांची हॅमर टेस्ट करण्यात आली होती. उद्यापासून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. या दोन्ही पुलांवरून दिवसभर वाहतूक सुरू असते. त्यामुळे, तपासणी करताना वाहतूक बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत.

हे आहेत पर्यायी मार्ग

वाहतुकीसाठी पर्यायही सुचवण्यात आला आहे. वाशिष्ठी पुलाकरिता पर्यायी रस्ता म्हणून चिपळूण बायपास फरशी तिठा हा मार्ग असेल, तर शास्त्री पुलाकरिता पर्यायी रस्ता शास्त्री पूल कसबा अंत्रवली फाटा, कडवई-तुरळ या मार्गाचा वापर करता येईल. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानुसार चिपळूण शहरातील वाशिष्ठी पूल क्र. १ वरील सर्व प्रकारची वाहतूक १० सप्टेंबरला दुपारी १२ ते ४ या वेळेत आणि पूल क्र. २ वरील वाहतूक ११ सप्टेंबरला दुपारी १२ ते ४ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. संगमेश्वर येथील शास्त्री नदीवरील शास्त्री पुलावरील वाहतूक १२ सप्टेंबरला दुपारी १२ ते ४ या वेळेत बंद राहील. या कालावधीत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा- लांजा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, बाजारपेठ बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.