रत्नागिरी - नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथकाने जिल्ह्यात अवैध दारू धंद्यावर छाप्याची विशेष मोहीम राबवली आहे. स्कॉर्पिओ वाहनांमधून गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करताना विशाल काशिनाथ ठसाळे, कल्याण मदन सुर्वे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील ५२५ लीटर हातभट्टीची दारू जप्त केली. या मोहिमेत ६ लाख ७९ हजार ४२० रू किमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. तर ४ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
ही कारवाई श्रीमती संध्याराणी देशमुख (अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी ) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद जाधव, शंकर जाधव, सुरेश पाटील, दुय्यम निरीक्षक किरण पाटील, श्री क्षीरसागर, राजेंद्र भालेकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक तसेच जवान विशाल विचारे, सागर पवार, अतुल वसावे, मिलिंद माळी यांनी केली.
हेही वाचा - पवन एक्सप्रेसच्या इंजिनला आग; प्रवाशांमध्ये गोंधळ
या कारवाईमुळे दारूधंदे करणाऱ्या व्यक्तींना चांगलीच जरब बसली. दि. २५ डिसेंबर ते २६ डिसेंबर या काळात येथे विदेशी मद्याची वाहतूक करताना एका इसमास दुचाकी वाहनासह अटक करण्यात आली आहे. तसेच चिपळूण शहरात गोवा मद्याच्या २५ बॉक्सचा बेकायदाशीर साठा जवळ बाळगून असलेल्या व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - सूर्यग्रहण अन् अंधश्रद्धा : कर्नाटकातील या गावात दिव्यांगाना पुरतात जमिनीत
गावठी हातभट्टी दारू निर्मिती केंद्रे, विक्री केंद्र अथवा गावठी हातभट्टी दारू वाहतुकीविषयी माहिती असल्यास अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी फडके वाडा, जेलरोड फगर वठार, रत्नागिरी या ठिकाणी प्रत्यक्ष अथवा टपालाने किंवा दूरध्वनीवर माहिती कळविण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी यांनी सर्व नागरिकांना केले आहे. याबाबत गोपनीयता पाळण्यात येईल, असे आश्वासनही विभागामार्फत देण्यात आले आहे.