ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिमगोत्सव साधेपणाने साजरा करा - उदय सामंत - shimgotsav uday samant news

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क अनिवार्य केले आहे. मास्क न वापरणार्‍यांवर पालिका, ग्रामपंचायत, महसुल विभागाबरोबर पोलिस यंत्रणेलाही अधिकार दिले असून मास्क न वापरणार्‍यांवर 500 रुपये दंडाची कारवाई केली जाईल.

uday samant
उदय सामंत
author img

By

Published : Feb 22, 2021, 8:33 PM IST

Updated : Feb 22, 2021, 9:29 PM IST

रत्नागिरी - कोकणातील सर्वांत मोठा सण शिमगोत्सव आहे. यावेळी सर्व चाकरमानी कोकणात दाखल होतात. मात्र, कोरोनाचे सावट असल्याने हा सण साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज जनतेला केले आहे. तसेच क्रिकेट, कबड्डी, स्नेहसंमेलन हेदेखील काही दिवसांसाठी थांबविली पाहिजेच. यातून प्रादुर्भाव वाढू शकतो. सगळ्या यंत्रणेला सहकार्य करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे. झुम अ‍ॅपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

झुमद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री उदय सामंत

मास्क अनिवार्य -

यावेळी सामंत म्हणाले की, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क अनिवार्य केले आहे. मास्क न वापरणार्‍यांवर पालिका, ग्रामपंचायत, महसुल विभागाबरोबर पोलिस यंत्रणेलाही अधिकार दिले असून मास्क न वापरणार्‍यांवर 500 रुपये दंडाची कारवाई केली जाईल. जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. मास्क वापरत नसलीत, तर पुन्हा नाकेबंदी किंवा नाईट कर्फ्युबाबत जिल्हाधिकार्‍यांनी निर्णय घ्यावा, असे सूचित केले असल्याचं ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा - विरोधी पक्षातील नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी- सुधीर मुनगंटीवार

एका रुग्णामागे 16 ऐवजी 20 रुग्ण तपासले जाणार -

यापुढे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल होणार्‍या कोरोना बाधिताच्या नातेवाइकांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त स्वॅब टेस्ट करण्याचा प्रयत्न आहे. खासगी रुग्णालयामध्ये गर्दी, ताप आदीचे रुग्ण उपचार घेऊन घरी जातात यांचीही माहिती घेतली जाणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग देखील वाढविले जाणार आहे. एका रुग्णामागे 16 ऐवजी 20 रुग्ण तपासले जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या 132 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून 64 रुग्ण हे बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. मात्र, त्यांचा पत्ता रत्नागिरीचा असल्याने त्यांची नावे लागली असल्याची माहितीही सामंत यांनी यावेळी दिली.

विनापरवाना कार्यक्रम घेतल्यास कारवाई होणार -

विनापरवाना सार्वजनिक कार्यक्रम घेतल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. एकूणच अंदाज घेऊन रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये. तरी रात्रीची संचारबंदी करण्याबाबत चर्चा सुरू आहे. जिल्हाधिकारी यावर निर्णय घेतली. ही वेळ येऊ नये, यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.

Last Updated : Feb 22, 2021, 9:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.