ETV Bharat / state

कोकणात शिमगोत्सवाचा जल्लोष ; अनेक ठिकाणी पेटले 'तेरसेचे होम' - shimga

गावातील होळीच्या मैदानात रात्री सुके गवत आणि झाडांच्या सुक्या फांद्या घेऊन पहाटेपर्यंत होम तयार केला जातो आणि सकाळी लवकर हे होम गावातील गुरव आणि मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये पूजा करून पेटवण्यात येतो.

कोकणात शिमगोत्सवाचा जल्लोष
author img

By

Published : Mar 20, 2019, 12:21 AM IST

रत्नागिरी - ढोल-ताशांच्या गजरात कोकणात मंगळवारी शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी होळी लागली. या उत्सवासाठी हजारो चाकरमाने कोकणात दाखल झाले आहेत. या होळीला कोकणात तेरसेचे होम असे म्हटले जाते. रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये जवळपास 5 गावांमध्ये तेरसेचे होम आज पेटवण्यात आले.

कोकणात शिमगोत्सवाचा जल्लोष

गावातील होळीच्या मैदानात रात्री सुके गवत आणि झाडांच्या सुक्या फांद्या घेऊन पहाटेपर्यंत होम तयार केला जातो आणि सकाळी लवकर हे होम गावातील गुरव आणि मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये पूजा करून पेटवण्यात येतो. होळी लागल्यानंतर नवविवाहित नवऱ्याने होळीत नारळ टाकण्याची परंपरा आहे. त्यानंतर ढोल आणि ताश्यांच्या तालावर देवीची पालखी नाचवली जाते. मंगळवारपासून पुढील १५ दिवस देवीची पालखी गावातील प्रत्येक घरी जाते. कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा असलेला या शिमग्याच्या उत्सवासाठी लाखो चाकरमनी गावी दाखल झाले आहेत.

Intro:कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह

आज अनेक ठिकाणी पेटले तेरसेचे होम

रत्नागिरी, प्रतिनिधी

कोकणात आज अनेक ठिकाणी होळी लागली. या होळीला कोकणात तेरसेचे होम असं म्हटलं जाते. रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये जवळपास 5 गावांमध्ये तेरसेचे होम आज पेटवण्यात आले. रात्री माडहोळी वाजत गाजत आणून झाल्यानंतर गावातील होळीच्या मैदानात सुके गवत, आणि झाडांच्या सुक्या फांद्या घेऊन पहाटे पर्यंत होम तयार केला जातो आणि सकाळी लवकर हे होम गावातील गुरव आणि मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये पूजा करून पेटवण्यात येतात. होळी लागली की नवे लग्न झालेल्या नवऱ्याने होळीत नारळ टाकण्याची परंपरा आहे, यानुसार होळीत नारळ टाकले जातात व त्यानंतर कोकणातील पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल आणि ताश्यांच्या तालावर देवीची पालखी नाचवली जाते, यावेळी गावच्या देवीच्या नावाने आरोळी दिली जाते, ज्याला फाका देणे असं म्हणतात.आजपासून पुढे 15 दिवस देवीची पालखी गावातील प्रत्येक घरी जाते. कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा असलेला या शिमग्याच्या उत्सवासाठी लाखो चाकरमनी गावी दाखल झाले आहेत.Body:कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह

आज अनेक ठिकाणी पेटले तेरसेचे होमConclusion:कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह

आज अनेक ठिकाणी पेटले तेरसेचे होम

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.