ETV Bharat / state

राणे-सरदेसाई वादाचे रत्नागिरीत पडसाद, आमदार नितेश राणेंविरोधात युवासेनेचे आंदोलन

सचिन वाझे प्रकरणात आमदार नितेश राणे यांनी युवा सेनेचे सरचिटणीस वरुण देसाई यांच्यावर व्यक्तिगत आरोप केल्याने वादाची ठिणगी पडली आहे. या आरोपानंतर रत्नागिरीतल्या युवासेनेने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

shivsena-youth-wing-ratnagiri-protested-in-ratnagiri
राणे-सरदेसाई वाद
author img

By

Published : Mar 16, 2021, 4:51 PM IST

रत्नागिरी - सचिन वाझे प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांनी युवासेना सरचिटणीस वरूण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. दरम्यान या आरोपांवरून रत्नागिरीतही युवासेनेने आमदार नितेश राणे यांचा निषेध करत नितेश राणे यांचा फोटो असलेला बॅनर पायदळी तुडवला. यावेळी युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी अजिंक्य मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलो. कोरोनामुळे असलेल्या निर्बंधामुळे काही मोजकेच युवासैनिक यावेळी उपस्थित होते.

रत्नागिरीत आमदार नितेश राणेंविरोधात शिवसेनेचे आंदोलन..
शिवसेना-राणे वाद पेटला -
भाजप आमदार नितेश राणे आणि युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाईच्या वादाचे पडसाद कोकणात देखील पहायला मिळाले. सचिन वाझे प्रकरणात आमदार नितेश राणे यांनी युवा सेनेचे सरचिटणीस वरुण देसाई यांच्यावर व्यक्तिगत आरोप केल्याने वादाची ठिणगी पडली आहे. या आरोपानंतर रत्नागिरीतल्या युवासेनेने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर आमदार नितेश राणेंच्या फोटो पायदळी तुडवत निषेध केला. यानंतर प्रशासनाला निवेदनही दिले. काय आहे प्रकरण -

नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील सगळी काम आदित्य ठाकरे यांच्या गँगलाच का? असा सवाल केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मित्र परिवारातील जी काही निवडक मंडळी आहेत, त्यातील डिनो मोरिया आणि वरूण सरदेसाई आणि कदम या तिघांच्या कंपनीला सर्व टेंडर दिली जातात आणि त्यांच्याकडूनच ही कामे केली जातात. त्यामुळे या सरकारची कामे करण्याची जी पद्धत आहे ती संशयाची आहे. खरं तर हा माझा आरोप आहे, की सरकार या सगळ्यांना पाठीशी घालत आहे. त्यात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांना प्रामुख्याने पाठीशी घालतात. त्याचं कारण असं आहे की, त्यांचे पारिवारिक संबंध आहेत आणि मी जे काल ट्विट केलेलं होतं ते त्याच अनुषंगाने केलेलं होतं.नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्यावरती त्यांनी टीका आणि आरोप केले आहेत की, वरूण सरदेसाई आणि सचिन वाझे यांचे आर्थिक गैरव्यवहार होते. त्यांनी एकमेकांशी भरपूर वेळा संपर्क साधलेला होता आणि त्यांच्या सीडीआर चौकशीची मागणी आम्ही करत आहोत. त्यांची चौकशी एनआयएकडून व्हावी, अशी आमची मागणी आहे. असे नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वरुण सरदेसाईंचं स्पष्टीकरण -

आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सचिन वाझे आणि वरूण सरदेसाई यांच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, असा आरोप या वेळेस नितेश राणे यांनी केला होता. या सर्व प्रकरणावर वरूण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या आरोपांचे त्यांनी खंडण केले आहे. राणे कुटुंबीय हे माझ्या राजकीय जीवावरती उठले आहेत, असा गंभीर आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

हेही वाचा - माझं राजकीय जीवन संपवण्याचं काम राणे कुटुंबीय करतंय - वरूण सरदेसाई

रत्नागिरी - सचिन वाझे प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांनी युवासेना सरचिटणीस वरूण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. दरम्यान या आरोपांवरून रत्नागिरीतही युवासेनेने आमदार नितेश राणे यांचा निषेध करत नितेश राणे यांचा फोटो असलेला बॅनर पायदळी तुडवला. यावेळी युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी अजिंक्य मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलो. कोरोनामुळे असलेल्या निर्बंधामुळे काही मोजकेच युवासैनिक यावेळी उपस्थित होते.

रत्नागिरीत आमदार नितेश राणेंविरोधात शिवसेनेचे आंदोलन..
शिवसेना-राणे वाद पेटला -भाजप आमदार नितेश राणे आणि युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाईच्या वादाचे पडसाद कोकणात देखील पहायला मिळाले. सचिन वाझे प्रकरणात आमदार नितेश राणे यांनी युवा सेनेचे सरचिटणीस वरुण देसाई यांच्यावर व्यक्तिगत आरोप केल्याने वादाची ठिणगी पडली आहे. या आरोपानंतर रत्नागिरीतल्या युवासेनेने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर आमदार नितेश राणेंच्या फोटो पायदळी तुडवत निषेध केला. यानंतर प्रशासनाला निवेदनही दिले. काय आहे प्रकरण -

नितेश राणेंनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील सगळी काम आदित्य ठाकरे यांच्या गँगलाच का? असा सवाल केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की आदित्य ठाकरे आणि त्यांच्या मित्र परिवारातील जी काही निवडक मंडळी आहेत, त्यातील डिनो मोरिया आणि वरूण सरदेसाई आणि कदम या तिघांच्या कंपनीला सर्व टेंडर दिली जातात आणि त्यांच्याकडूनच ही कामे केली जातात. त्यामुळे या सरकारची कामे करण्याची जी पद्धत आहे ती संशयाची आहे. खरं तर हा माझा आरोप आहे, की सरकार या सगळ्यांना पाठीशी घालत आहे. त्यात आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांना प्रामुख्याने पाठीशी घालतात. त्याचं कारण असं आहे की, त्यांचे पारिवारिक संबंध आहेत आणि मी जे काल ट्विट केलेलं होतं ते त्याच अनुषंगाने केलेलं होतं.नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्यावरती त्यांनी टीका आणि आरोप केले आहेत की, वरूण सरदेसाई आणि सचिन वाझे यांचे आर्थिक गैरव्यवहार होते. त्यांनी एकमेकांशी भरपूर वेळा संपर्क साधलेला होता आणि त्यांच्या सीडीआर चौकशीची मागणी आम्ही करत आहोत. त्यांची चौकशी एनआयएकडून व्हावी, अशी आमची मागणी आहे. असे नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

वरुण सरदेसाईंचं स्पष्टीकरण -

आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेचे नेते वरूण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सचिन वाझे आणि वरूण सरदेसाई यांच्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे, असा आरोप या वेळेस नितेश राणे यांनी केला होता. या सर्व प्रकरणावर वरूण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या आरोपांचे त्यांनी खंडण केले आहे. राणे कुटुंबीय हे माझ्या राजकीय जीवावरती उठले आहेत, असा गंभीर आरोप देखील यावेळी त्यांनी केला.

हेही वाचा - माझं राजकीय जीवन संपवण्याचं काम राणे कुटुंबीय करतंय - वरूण सरदेसाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.