रत्नागिरी - ज्याचा अपराध असेल त्याला मुख्यमंत्री कधीच पाठीशी घालणार नाहीत, असे रोखठोक विधान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने आरोप केलेल्या मंत्री संजय राठोड यांच्याबाबत बोलताना खासदार राऊत यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संजय राठोड यांच्यावर पक्षातून कारवाई होणार का? याबाबत तर्क वितर्कांना उधान आले आहे. राऊत आज रत्नागिरीत बोलत होते.
तर त्या प्रकाराला मुख्यमंत्री भीक घालणार नाहीत
यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की, जर चूक असेल तर त्यावर कारवाई नक्की केली जाईल, पण एखाद्याला बळी देण्याचा प्रकार जर भाजप करत असेल तर त्या प्रकाराला मुख्यमंत्री कदापी भीक घालणार नाहीत, असेही खासदार विनायक राऊत यांनी भाजपला सुनावले आहे. महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे समजूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना न्याय देण्याचे काम करत असतात. त्यामुळे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कारट्या ही नीती उद्धव साहेबांकडे कधीच नसल्याचेही खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
अपराध असेल त्यांना मुख्यमंत्री कधीच पाठीशी घालणार नाहीत - खा. विनायक राऊत - वनमंत्री संजय राठोड
महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे समजूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकांना न्याय देण्याचे काम करत असतात. त्यामुळे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कारट्या ही नीती उद्धव साहेबांकडे कधीच नसल्याचेही खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.