रत्नागिरी- आरक्षणाबाबत राज्य सरकारने केलेल्या कायद्याबाबत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी महत्त्वाचे ( Bhaskar Jadhav on Elections in Maharashtra ) विधान केले आहे. 'राज्य सरकारने कायदा केला असला तरी निवडणुका उद्यादेखील होऊ शकतात, आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. कारण 74 व्या घटना दुरुस्तीनुसार निवडणुका केव्हा घ्यायच्या हा अधिकार निवडणूक आयोगाचा ( Election commissions right for election conduct ) आहे. राज्य सरकारचा नाही, असेही आमदार जाधव यांनी म्हटले. त्यांनी जाहीर कार्यक्रमात सरकारला घरचा आहेर दिला आहे.
आमदार भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav ) म्हणाले, की ओबीसी आरक्षणबाबत राज्य सरकारने कायदा केला आहे. पण, मी याबाबत साशंक आहे. निवडणुका या चार किंवा सहा महिन्यांनी नाही, तर उद्यादेखील होऊ शकतात. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इमारत विस्तारिकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी ( Ratnagri ZP building construction ) आमदार जाधव बोलत होते. त्यावेळी व्यासपीठवर कॅबिनेट मंत्री उदय सामंत हेदेखील हजर होते. त्यामुळे भास्कर जाधव यांनी केलेल्या विधानावरून त्यांना काय सुचवायचे आहे? अशी चर्चा यावेळी सुरू झाली.
हेही वाचा-RBI Action On Paytm Bank : पेटीएमला शेअर बाजारात पुन्हा झटका, शेअरची किंमत 700 च्या खाली
दरम्यान नवीन इमारतचे काम हे पुढील 25 ते 30 वर्षाचा विचार करून झाले पाहिजे असे, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. उपमुख्यमंत्री म्हणाले, की उदय सामंत तुम्ही लक्ष घाला. कामे वेळेत झाली पाहिजेत. कारण इमारत ही शहराच्या सुंदरतेत भर घालत असते, अशा सूचना यावेळी अजित पवार यांनी केल्या आहेत. भास्कर जाधव यांचे सुपुत्र आणि जिल्हापरिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार विनायक राऊत ऑनलाईन हजर होते.
हेही वाचा-Chemistry question paper leak : बारावीचा पेपर फुटला नसल्याचा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा दावा