ETV Bharat / state

Shivsena Active In Ratnagiri : रत्नागिरीत शिवसेना झाली सक्रीय, 10 जुलैला मेळावा - शिवसेनेचा रत्नागिरीत मेळावा

शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी ( Rebellion In Shivsena ) होऊन बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवे सरकारही स्थापन झाले आहे. मात्र, अद्यापही शहरी, ग्रामीण भागातील शिवसैनिक ठामपणे शिवसेनेच्या मागे उभा आहे. तेच दाखविण्यासाठी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा 10 जुलै रोजी मेळावा ( Shivsena Rally In Ratnagiri ) आयोजित करण्यात आला आहे.

shivsena action mode
shivsena action mode
author img

By

Published : Jul 3, 2022, 9:17 PM IST

रत्नागिरी - महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेल्या शिवसेनेला एखाद्या बंडखोरीने ( Rebellion In Shivsena ) ग्रहण लागू शकत नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न आता शिवसेनेकडून होऊ लागला आहे. त्याचसाठी रत्नागिरी मतदारसंघामध्ये येत्या 10 जुलै रोजी शिवसेनेचा मेळावा ( Shivsena Rally In Ratnagiri ) आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरीतील शिवसेना शाखा अभेद्य आहे. कोणीही कितीही धक्का देण्याचा प्रयत्न केला तरीही काहीही फरक पडणार नाही, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेनेचा रत्नागिरीत 10 जुलैला मेळावा

सामंतांनी कोणतीही कल्पना दिली नाही - राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. दरम्यान, रत्नागिरीतील शिवसेना ही अभेद्य असून, इथले कार्यकर्ते, शिवसैनिक सर्वजण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत, असं जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी आज खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. तसेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा येत्या 10 जुलै रोजी मेळावा होणार असल्याचंही चाळके यांनी यावेळी स्पष्ट केलं. उदय सामंत यांनी पक्ष सोडून जाताना कोणतीही कल्पना कोणालाही दिली नव्हती, असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा - Ajit Pawar To CM Eknath Shinde: सांगितले असते तर आधीच मुख्यमंत्री केले असते - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.