ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी रोहन बने, तर उपाध्यक्षपदी महेश नाटेकर बिनविरोध

जि.प. सदस्य विक्रांत जाधव मात्र यावेळी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी अनुपस्थित होते. एकीकडे राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे वडील शिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज आहेत. त्यांनी नाराजी बोलूनही दाखविली होती. त्यातच आज विक्रांत जाधव अनुपस्थित राहिल्याने त्यांचीही नाराजी आहे का ? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

रत्नागिरी जिल्हापरिषद अध्यक्षपदी रोहन बने, तर उपाध्यक्षपदी महेश नाटेकर बिनविरोध
रत्नागिरी जिल्हापरिषद अध्यक्षपदी रोहन बने, तर उपाध्यक्षपदी महेश नाटेकर बिनविरोध
author img

By

Published : Jan 1, 2020, 6:45 PM IST

रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी रोहन बने आणि उपाध्यक्षपदी महेश नाटेकर यांची आज (बुधवारी) बिनविरोध निवड झाली. रोहन बने हे संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गटातून निवडून आले आहेत. तर महेश नाटेकर गुहागर तालुक्यातील पडवे गटातून निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व असून, ५७ पैकी ३८ सदस्य शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शिवसेनेची एकहाती सत्ता आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरुपा साळवी यांची सव्वा वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे त्यांना मुदतवाढ मिळाली होती. दरम्यान नोव्हेंबरमध्ये राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाले. त्यामुळे अनेक जण इच्छुक होते. त्यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील जि. प. सदस्य असलेले व माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सदस्य उदय बने, शिवसेना नेते रामदास कदम यांचे बंधू व माजी बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती अण्णा कदम, भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांची नावे चर्चेत होती. अखेर मातोश्रीवरून रोहन बने यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

बुधवारी रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. शिवसेनेने अध्यक्षपदासाठी रोहन बने यांच्या तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेने महेश नाटेकर यांच्या नावाची घोषणा केली. दुपारी अडीच वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. शिवसेनेचे 39 सदस्य असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकही अर्ज न आल्याने अध्यक्षपदी बने आणि उपाध्यक्षपदी नाटेकर बिनविरोध विजयी झाले. विजयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे आणि जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उद्योजक किरण सामंत, माजी आमदार सुभाष बने, माजी अध्यक्षा स्वरूपा साळवी, उपाध्यक्ष संतोष गोवळे, सभापती विनोद झगडे, साधना साळवी, प्रकाश रसाळ अरूण कदम, नगराध्यक्ष प्रदीप साळवी उपस्थित होते

भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव अनुपस्थित

जि.प. सदस्य विक्रांत जाधव मात्र यावेळी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी अनुपस्थित होते. एकीकडे राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे वडील शिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज आहेत. त्यांनी नाराजी बोलूनही दाखविली होती. त्यातच आज विक्रांत जाधव अनुपस्थित राहिल्याने त्यांचीही नाराजी आहे का? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

Intro:जिल्हापरिषद अध्यक्षपदी रोहन बने आणि उपाध्यक्षपदी महेश नाटेकर बिनविरोध

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या अध्यक्षपदी रोहन बने आणि उपाध्यक्षपदी महेश नाटेकर यांची आज (बुधवारी) बिनविरोध निवड झाली. रोहन बने हे संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गटातून निवडून आले आहेत. तर महेश नाटेकर गुहागर तालुक्यातील पडवे गटातून निवडून आले आहेत.
जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे वर्चस्व असून , ५७पैकी ३८ सदस्य शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरुपा साळवी यांची सव्वा वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर लोकसभा , विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे त्यांना मुदतवाढ मिळाली होती. दरम्यान नोव्हेंबरमध्ये राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाले. त्यामुळे अनेक जण इच्छुक होते.. त्यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील जि. प. सदस्य असलेले व माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सदस्य उदय बने, शिवसेना नेते रामदास कदम यांचे बंधू व माजी बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती अण्णा कदम, भास्कर जाधव यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांची नावं चर्चेत होती. अखेर मातोश्रीवरून रोहन बने यांचं नाव निश्चित करण्यात आलं..
बुधवारी रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. शिवसेनेने अध्यक्षपदासाठी रोहन बने यांच्या नावाची घोषणा केली. जिल्हापरिषद उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेने महेश नाटेकर यांच्या नावाची घोषणा केली. दुपारी अडीच वाजता निवडणूक प्रक्रिया सुरु झाली . शिवसेनेचे 39 सदस्य असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकही अर्ज न आल्याने अध्यक्षपदी रोहन बने आणि उपाध्यक्षपदी महेश नाटेकर बिनविरोध बिनविरोध विजयी झाले. विजयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला . नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे आणि जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उद्योजक किरण सामंत, माजी आमदार सुभाष बने , माजी अध्यक्षा स्वरूपा साळवी , उपाध्यक्ष संतोष गोवळे , सभापती विनोद झगडे, साधना साळवी , प्रकाश रसाळ अरूण कदम, नगराध्यक्ष प्रदीप साळवी उपस्थित होते

भास्कर जाधव यांचे जिरंजीव विक्रांत जाधव अनुपस्थित

जि. प. सदस्य विक्रांत जाधव मात्र यावेळी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी अनुपस्थित होते.
एकीकडे राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे वडील शिवसेना आमदार भास्कर जाधव नाराज आहेत. त्यांनी नाराजी बोलूनही दाखविली होती. त्यातच आज विक्रांत जाधव अनुपस्थित राहिल्याने त्यांचीही नाराजी आहे का ? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

Body:जिल्हापरिषद अध्यक्षपदी रोहन बने आणि उपाध्यक्षपदी महेश नाटेकर बिनविरोध
Conclusion:जिल्हापरिषद अध्यक्षपदी रोहन बने आणि उपाध्यक्षपदी महेश नाटेकर बिनविरोध
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.